Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्याची वाटचाल.....
सुलेखन ✍️
सुलेखन ✍️
1st Jul, 2023

Share

पायात रुतला काटा
म्हणून काय जगणं सोडून देऊ,
डोळ्यात स्वप्न आहेत उद्याची
म्हणून काय  हसणं सोडून देऊ...
सोबतीला नाही आपलं कुणी
म्हणून काय लढण सोडुन देऊ ...
आज हसवायला नाही कुणी ,
म्हणून काय हसणं सोडुन देऊ ....
नयनातलं आटल पाणी माझ्या ,
मग काय रडणं सोडुन देऊ...
नसेलही इवल्याशा पायात दम
मग काय सावरणं सोडुन देऊ...
हिणवतात अपयशी म्हणुन सारे ,
मग काय लढन सोडुन देऊ..
असेलही दुःखात मी आज
मग काय आनंद वाटनं सोडुन देऊ...
⭐शुभ रात्री⭐

0 

Share


सुलेखन ✍️
Written by
सुलेखन ✍️

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad