राती नंतर सकाळ सुंदर दारी आली घेऊन एक सूर्य नवा .....
जी करते दूर मनातील निराशा आणि मनात प्रवेश करते एक नवीन आशा .....
त्यात पक्षी करतात किलबिलाट आणि मग कोकिळा ही गाते मधूर सुरांची गाणी .....
दिन-रात ऐकत रहावीशी वाटते तिचीच वाणी .....
अंगणात सडा, रांगोळी काढून स्वागत करते रोज सकाळ चे
मग सकाळ ही हसून म्हणते आज कारण काय स्वागताचे .....
मी तिला उत्तर दिले आज कारण तुझ्या येण्याचे .....
म्हणूनच पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते झाली आनंदाची आज सुखाची सकाळ ......