वसंतराव नाईक यांचे नेतृत्व ग्रामीण भागातून उदयास आले आहे... महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक , राजकीय कृषिविषयक व शैक्षणिक जडणघडणीत वसंतराव नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राचे मंत्री व मुख्यमंत्री म्हणून कार्य करतांना सामान्यातील सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या विकासात्मक कार्याची वाटचाल केली आहे. शेतकरी👳💦 हा भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे. 'शेतकरी जगला तरच देश जगेल', अशी धारणा वसंतराव नाईक यांनी शेतकरी व शेतीच्या विकासासाठी जीवाचे रान केलेले दिसून येते.
राजकीय क्षेत्रात सामान्य नागरिक लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य घटक बनावा यासाठी लोकशाही विकेंद्रीकरणावर त्यांनी भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची रचना अतिशय सुकर बनली .
मंत्री व मुख्यमंत्री पदावर कार्य करतांना वसंतरावजी नाईक यांनी सातत्याने नवनवीन योजना राबवून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचे कार्य केले. म्हणूनच त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जाते. वसंतराव नाईक यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्ता आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर ११ वर्षापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री पद सांभाळले. एका छोट्याशा खेड्यातून स्वत:च्या जीवनाची वाटचाल करताना आपल्या कार्य कर्तृत्वाची छाप संपूर्ण महाराष्ट्र व भारतात निर्माण केली...
हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आद. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐🙏