हास्य विनोद करमणुकीला आपण अध्यात्म समजतोय हिच मोठी गफलत आहे
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
1st Jul, 2023
Share
*हास्य विनोद करमणुकीला आपण अध्यात्म समजतोय हिच मोठी गफलत आहे*
हास्य विनोद करमणूक हा फार फार तर टाईमपास होऊ शकतो.पण आपण टाईमपासला अध्यात्म समजतोय हिच आपल्या जीवनातील सगळ्यात मोठी गफलत झाली आहे. स्वतःची ओळख होऊन मी पणापासून मुक्ती मिळण्यासाठी अध्यात्म आहे.पण या सत्या पासुन आपण कोसो दुर आहेत. सत्य हे कटु असतं पचणासाठी रूचकर नसतं.प्रसिद्धीने मोठा झालेला व्यक्ती विचाराने संस्काराने मोठा असेलच असं नाही क्वचित प्रसंगी हा योगायोग जुळून येऊ शकतो कारणं अपवाद हा निसर्गाचा नियम आहे . प्रसिध्दी आणि विचाराने जो मोठा असतो तोच खरा महात्मा असतो . आजकाल आपल्यला खरा महात्मा लक्षात येत नाही . खरा महात्मा सत्य कथन करतो .ते आपल्या डोक्यावरून जात कारणं सत्य हे कटु असतं त्या मुळे ते आपल्या पचनी पडत नाही. म्हणून आपण खरा महात्मा ओळखण्यात चुकतो . आणि आजच्या आध्यत्मिक क्षेत्रातील खरी गडबड इथंच आहे .आपण आध्यत्मिक तत्वज्ञान ऐवजी विनोद आणि प्रसिद्धी ला भुलतो अध्यात्म हे मुळात प्रसिद्धी साठी नाही आणि प्रसिद्धी मिळण मिळवण त्यासाठी प्रयत्न करणं या मध्ये गैर काहीच नाही .पण या मध्ये कुठेतरी स्व विवेक महत्वाचा आहे .आध्यत्मिक क्षेत्रावर सिने क्षेत्राचा प्रभाव निर्माण होताना दिसत आहे .अनेक अशी वेगवेगळी आध्यत्मिक साहित्य रचना सिनेमातील ताल सुर आणि संगितावर आधारित निर्माण होत आहे याचं कारण हि तसंच आहे . लोकांना ज्या तलात आवश्यक असतं त्या तलात त्या सुरात त्या पद्धतीने ते निर्माण होतं.पण हे नक्कीच आध्यत्मिक क्षेत्रासाठी भुषनिय नाही .आणि अनेक दैवी देवता यांच्या संदर्भात पण अशाच पद्धतीनं ताल सुर लय बसवला जातो .हे मनोरंजन म्हणून ठिक आहे . पण अध्यात्म म्हणून योग्य नाही .आणि अध्यात्म आवश्यक आहे कि मनोरंजन महत्वाचे आहे. यावर मंथनाची चिंतनाची व सत्याचा वेध घेण्याची आवश्यकता आहे . शेवटी हा प्रत्येकाचा व्यक्तिगत पातळीवरील विषय असला तरी सर्वांनी एक लक्ष्मण रेषा पाळली पाहिजे . महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे . महाराष्ट्राचा वसा आणि वारसा हा आध्यत्मिक परंपरेचा आहे . एकंदरीत महाराष्ट्रातील लोकजीवनावर अध्यात्माचा खुप मोठा प्रभाव आहे .हा प्रभाव आपली संस्कृती आणि संस्कार टिकविण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी खुप मोठं योगदान देणरा आहे.आणि तो असलाही पाहिजे . त्यामुळे महाराष्ट्रातील गावा गावात किर्तन , प्रवचन , रामायण, भगवद्गीता,अशा अनुषंगाने प्रत्यक्षात तसेच सोशल मध्यमा तुन अनेक उपक्रम होत असतात आणि याच कार्यक्रमात अनेक आध्यत्मिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन होत असत .याच दरम्यान लोकांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी काही प्रमाणात विनोद पण करावे लागतात मुळात विनोद हा चुकीचा विषय नाही . उलट लोकांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी विनोद केला पाहिजे .या मध्ये गैर असं काही नाही .पण विनोद सुद्धा दर्जेदार असला पाहिजे त्याची पातळी संस्कारांच पतन होणार नाही अशीच असली पाहिजे .सध्याची लोकमानसिकता पाहता सुद्धा अध्यात्मिक ज्ञान , पुर्ण वेळ देणं म्हणजे जे काही नियोजित वेळ आहे तेवढा वेळ लोक ऐकु शकतील असं शक्य वाटतं नाही.किंवा मग बहुधा ते लोकांच्या डोक्यावरून जात . हि वास्तविक परस्थिती आहे . वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अध्यात्मिक क्षेत्रात विनोदाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे झाला . अध्यात्म म्हणजे जीवन समृद्धीचा मार्ग आहे . संस्कार आणि संयुक्त समाजरचनेचा पाया असणार्या आध्यत्मिक क्षेत्रात योग्य आणि आध्यत्मिक मार्गदर्शन होण्याऐवजी दर्जा हिन विनोदाचे प्रमाण वाढले आहे आणि विनोद इथपर्यंत ठिक आहे पण जर विनोदच अध्यात्माच्या मुळं पायावर होऊ लागला तर आदर्श काय घेयचा आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आध्यत्मिक क्षेत्रात आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकतो हे ऐकत असताना आपला उत्साह कायम ठेवणं हे सांगणाराच कौशल्य असत परंतु अनेकदा हे सांगताना उत्साहात अध्यात्माच्या क्षेत्रात जे देव देवता महापुरुष होऊन गेले तेच विनोदाच्या कक्षेत येतात आणि खरी गडबड इथंच होते असं नाही झाल पाहिजे आध्यत्मिक मार्गदर्शन चालू असताना लोकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी जे विनोद आहेत ते अध्यात्म कार्य कक्षेच्या बाहेरील असले पाहिजे जेणेकरून बोलण्याच्या ओघात काही गडबड होणार नाही हा कुणाला सल्ला नाही उपदेश नाही परंतु प्रत्येकाने या विषयाची स्व अनुभूती मधुन दखल घेतली पाहिजे आणि अध्यात्म व विनोद हे वेगळे असले पाहिजे अध्यात्माचा विनोद होणार नाही याची दक्षता घेणं हेच महत्त्वाचे आहे
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक ,तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य