Bluepad | Bluepad
Bluepad
जिवन वरचढ होऊ देऊ नका .
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
30th Jun, 2023

Share

जिवन जगायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत जिवन आनंदाने , समाधानाने , शांतीने जगणे , यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही .करीता जिवनात नेहमी प्रसन्न , खुश राहणे या पेक्षा दुसरे सुख नाही . बाकी तर सुख दुःखाचे प्रसंग येत जात असणार . ‌केव्हा आपला जिवलग आपणास पासून दुर जाईल तर केव्हा कोणी दुरचा जवळ येईल . माणसाची योग्यता ही कर्मामुळे निश्चित होत असते . जन्माला आलेला प्रत्येक माणुस सुरवातीच्या काळात शुन्यच असतो . जिवनातील विचारधारा असी असली पाहिजे आपले विचार लेखन एकदा नाहीतर अनेकदा लोकांनी ऐकले पाहिजे , वाचले पाहिजे . समुद्र नाही बनाता आले तरी चालेल पण ह लहानच का होईना लहानसा तलाव बणणे कधीही चांगले . जिवनात समस्या तर नेहमीच असणार . परंतु बुध्दीमतेने जगही जिंकता येते .जिथे बुद्धी तिथे सिध्दी . माणुस जिवनातील अनेक प्रसंगांत जिवन जगताना यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असतो. आणि यशस्वी होण्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न , मेहनत , परिश्रम करीत असतो . आणि यशस्वी होतानाच काही सुप्त आशा आकांक्षा मोठे होत असतात. या आशा आकांक्षा जपतानाच काही महत्त्वाकांक्षा पण अशा असतात आपले काम पूर्ण होतानाच कठिण काम सुध्दा पुर्ण होईपर्यंत चैन पडत नाही . असा दृष्टिकोन जोपासणारे माणसेच जास्तीत जास्त प्रमाणात यशस्वी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत . आणि हे अशक्य असे काहीच नाही . केवळ लक्षपुर्तीसाठी , उद्दिष्टे पुर्तीसाठी , ध्येय पुर्तीसाठी काम करतानाच आंतरीक महत्त्वाकांक्षा पण मोठी असते . आपल्या कामाची , कार्याची दखल कुणाकडून तरी घेतली जावी . प्रशंसा व्हावी .असे जरी वाटत असले तरी मित्रांनो सत्य हेच आहे ‌आपले कार्य व्यक्तिनिष्ठ पातळीवर आपल्या स्वहितासाठीच मर्यादित असते . त्यामुळे कोणी दखल घेतली किंवा नाही यासाठी वाईट माणुन घेण्याची गरज नसते . कामाला जिंकणे हेच महाकठीण काम असले तरी असंभवनीय नाही , अशक्य नाही . कामासाठी रांत्रदिवस एक करणारे अनेकजण आहेत . अशांचे काम पुर्ण होतंच असते . आणि यासाठी प्राकृतिक पध्दतीने असे कोणतेही काम किंवा कार्य मोठे नाही , की ते पुरस्काराने सन्मानित केले जाईल . कोणतेही काम जनहितार्थ हेतुने केले जाते तेव्हा त्यात स्वहित जास्त असतो. ज्याप्रमाणे बॅंकेत जमा धन रक्कम हे बॅंकेच्या ऊपयोगापेक्षा आपल्याच फायद्याचे जास्त असते . आपण एखाद्यावर कृपा करीत असतो किंवा त्याच्या हिताचा विचार करीत असातो तेव्हा ते भविष्यात आपल्याच फायद्याचे ठरते . प्रसंगानुरूप हजारो हाताची मदत अप्रत्यक्षरीत्या समोर संचय होत असते . आणि हीच हिम्मत माणसाला मोठे व यशस्वी करण्यासाठी पुरेसे असते . वेळ कुणाचीही वाईट नसते प्रयत्न असेच असले पाहिजे आपल्या मुळे कुणावरही वाईट वेळ येऊ नये . माणुस पतंगा सारखं आहे . तोल जर बरोबर साधला गेला असेल तर जास्तीत जास्त ऊंचाई गाठता येतं . आणि तोल जर बरोबर साधला नसेल तर ते चक्राकार घिरट्या घालत असते . काच पारदर्शक असते परंतु फुटल्या गेली तर ते रूतण्याचीच भित्ती जास्त असते . त्याचप्रमाणे स्वप्न आणि नांते ,धन संपत्ती तेव्हाच सार्थकी ठरते जेव्हा धर्म सोबत असतो . माणसाची विशिष्टता तेव्हाच सार्थकी ठरते जेव्हा व्यवाहारातील शिष्टता विश्वास सोबत असते .सुंदरता तेव्हाच सार्थकी ठरते जेव्हा मन आणि चरित्र शुद्ध असते . नाते तेव्हाच सार्थकी ठरते जेव्हा प्रेम सदभाव सदैव सोबत असतो . जिवन प्रवास सोपा कठीण की आनंदाची यात्रा आहे . यासाठी स्वताचा अभ्यास आपणास कळते .. नाराजी पासून दुर राहणे हेच खरे , परंतु नाराजीला वरचढ होऊ देऊ नका. जिवन प्रवासात वयाच्या प्रत्येक एक एक पायरी समोर जाताना अनेक अनुभव परिपक्व होतानाच , वाढते वयानुसार एक वेळ अशी येते , स्वताच्या प्रकृतीकडे दृष्टी जाताच , आता पर्यंत स्वःतासाठी कधी विचार न करणारा माणूस शेवटी चिंता करायला लागतो . शरीर सुंदर असो अथवा नसो , जसे जिवनात भौतिक सुखासाठी अनेक वस्तू विकत घेतो . त्या वस्तुंचे उपयोजन करताना थोडंसं खरचटलं तरी शरीराला त्रास होतो . मनाला चिंतन करीत समाधान मानावे लागते . लाख मोलाची संपत्ती असलेले शरिराकडे दुर्लक्ष करीत प्रवासाच्या शेवटच्या पायरीपर्यत पोहचत जवळ जातानाच अनेक प्रसंग विस्मृतीतल विषय दृष्टीसमोर खेळताना जाणवते आणि मागोवा घेतानाच माणुस आत्मिक समाधान कडे वळतो. माझे कर्तव्य कर्म आता शेवटच्या टप्प्यात आहेत. मग कुणासाठी जगलो, आता कुणासाठी जगु . प्रत्येक बाबींना मर्यादा असतात तसेच जिवनाला कर्माला सुध्दा मर्यादा असतात.लोक चेहरे विसरून जातात . परंतु शब्द विसरले जात नाहीत. हे प्रत्येकाच्या बाबतीत सत्य आहे . जेवढं आठवायला वेळ लागत नाही तेवढेच विसरण्या साठी वेळ लागतो . याऊलट अनुभव तंत्रज्ञान सांगतो डिलीट एका क्षणात होते परंतु स्टोर व्हायला वेळ लागतो . काय सत्य आणि असत्य हे जिवनात सर्वच सोडावे लागते . म्हणुनच शेवटी असा क्षण येतो सोडून द्या माणसांना समजणे आणि ओळखणे . आवश्यकता असो नसो शेवटी ती वेळ येतेच . जिवन प्रवास कठीण तेवढेच चांगले असो की वाईट हे जग सोडून एक दिवस जाणेच आहे भिती सांगते जिवन प्रवास प्रत्येक पायरीवर सोपं तेवढेच असंभवनीय आहे . अनुभव सांगतो जीवन प्रवास जोखमीचे तसेच संघर्ष पुर्ण आहे . तर्क सांगतो जीवन प्रवास फारच कठीण आहे . आणि आत्मविश्वास , हिम्मत सांगते प्रयत्न वाळुचे रगडीता तेलही गळे . प्रयत्न करीत प्रवास करा कठीण काहीच नाही . शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालु ठेवा. आणि निष्कर्ष सांगुन जाते ‌ निर्णय घेऊ शकत नाही अशा चंचल स्थितीत स्वताचे नुकसान करून बसतो . योग्यवेळी वेळी अयोग्य निर्णय घेणं हे सुद्धा जिवनात मागे असण्याचे असफल एक कारण असु शकते . आपले निर्णय योग्य असेल परंतु ते निर्णय घेताना वेळ सुध्दा योग्य असली पाहीजे. हे महत्त्वपूर्ण नाही की लोक आपल्याविषयी काय विचार करतात या पेक्षा आपण स्वतः बद्दल काय विचार करतो . स्वतः च्या संदर्भात कोणत्याही क्षणांसाठी नकारात्मक विचार करू नका . आणि नाराजीला आपल्यापेक्षा वरचढ होऊ देऊ नका . यासाठीच जीवन प्रवासात योग्य वेळी योग्य निर्णय घ्या . निर्णय हिम्मतीने योग्य वेळी घ्या . हाच जिवन प्रवास आहे . जिवन असे पर्यंत नंतर पुन्हा हे जिवन नाही . आनंदी राहा सुरक्षित राहा स...माधानी राहा . धन्यवाद नमस्कार.
Ghanshyam L Sangidwar 9511736153.
 जिवन वरचढ होऊ देऊ नका .
🙏🌹जय श्री कृष्ण जय राधा कृष्ण 🍂🌹

0 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad