Bluepad | Bluepad
Bluepad
सारे उपवास मी गंगेत सोडले
Vaishali Gund
Vaishali Gund
29th Jun, 2023

Share

खरंतर 72 वर्षाच्या तरुणीने दिलेला हा सल्ला.
पुण्यातल्या स्वरूपा वेदक या माझ्या मानस आई. बरीच वर्ष आम्ही एका ग्रुपवर ॲक्टिव्ह होतो .त्यानंतर आमचा संपर्क झाला .आम्ही समक्ष भेटलो आणि चक्क त्यांच्या प्रेमातच मी पडले .अत्यंत सकारात्मक विचारांची.स्वामी भक्त. उत्साही पारदर्शी मनाची.आहे ते स्पष्ट बोलणाऱ्या ह्या व्यक्तीशी मग संपर्क वाढतच गेला.
जगाच्या लेखी आपण काय कमावलं? यापेक्षा आपण काय गमावलं याचा हिशोब आपण करत बसतो .परंतु आजच्या क्षणाला जगून घे आजचा दिवस आहे ना मग एन्जॉय कर असं म्हणणार हे सदाबहार व्यक्तिमत्व. कुवेत मध्ये राहून सुद्धा प्रचंड लाखो करोडो रुपयांमध्ये खेळणाऱ्या या बाईंन चक्क हे सगळं स्वाहा केलं .आयुष्याचा प्रवास हा एकट्याचा असतो आणि तो एकट्यानेच करावा लागतो. तर मग सोबत असणाऱ्यांची आणि नसणाऱ्यांची तमा मि का बाळगू ?स्वतःच रुटीन मस्त लावून घेतलेल्या सकाळच्या सूर्योदयापासून झाड पान फुलं यावर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व संध्याकाळी झोपताना सुद्धा परमेश्वराचा नामस्मरण हे तीच्या कडून सहज आणि सुलभ होत असतं .त्यांच्याकडून आयुष्याचा लेखाजोगा मांडताना forget it असं म्हणत enjoy every time enjoy every day असे म्हणणाऱ्या या तरूणीला जो कोणी भेटेल त्याला प्रथम आश्चर्यच वाटेल. हे कसं शक्य आहे ? कसं जमतं? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपोआप मिळत जातील .आज आषाढी एकादशी प्रत्येकाने उपवास केला .परंतु स्वतःच्या तब्येती शिवाय बाकी काही नाही .देवधर्म उपवास याहीपेक्षा आपलं कर्म आणि आपली श्रद्धा अटल असावी. इतकं साधं तत्त्वज्ञान सांगणारी ही माऊली आज आषाढी एकादशीचा उपवास आहे का? असं विचारल्यानंतर मी उपवास गंगेत सोडले असं ठामपणे सांगणारी अंधश्रद्धेच्या वाटा मोडून देव भक्तीचा भुकेला आहे हेही ठळकपणे सांगणारी स्वरूपा आई वास्तवात जगणारी याही वयात इतकी सकारात्मक असणारी सोळा वर्षाची तरुणी फक्त वयाने बहात्तरात आहे. आज समाजामध्ये अशा विचारधारेची गरज आहे .बायकांनी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कदाचित हाच सल्ला आपल्याला ती देऊन जाते बायांनो बघा जमलं तर. कर्मकांडापेक्षा स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबाची काळजी देव देव्हाऱ्यात नाही देव आपल्या हृदयात आहे एवढंच सांगायचं होतं.🙏🏼
बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी

1 

Share


Vaishali Gund
Written by
Vaishali Gund

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad