Bluepadटाईम महाराष्ट्र न्युज-तुमच्या फोनमध्ये असणारे हे 30 अ‍ॅप आहेत धोकादायक! लगेच करा डिलीट
Bluepad

टाईम महाराष्ट्र न्युज-तुमच्या फोनमध्ये असणारे हे 30 अ‍ॅप आहेत धोकादायक! लगेच करा डिलीटटाईम महाराष्ट्र
टाईम महाराष्ट्र
20th Jun, 2020

Share

Google Play Store मधून हे अ‍ॅप हटवण्यात आले आहेत. जाणून घ्या कोणतेही आहेत हे अ‍ॅप्स
गूगलनं (Google) आपल्या प्ले स्टोअरमधून 30 प्रसिद्ध अ‍ॅप (popular apps) डिलीट केले आहेत. यात कित्येक अ‍ॅप असे आहेत, जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो. यातील बरेचसे अ‍ॅप हे फोटोंमध्ये ब्युटी फिल्टरसाठी वापरले जातात. गूगलनं हे अ‍ॅप डिलीट करण्याचे पाऊल मॅलिशियस मॅलवेअर(malicious malware) अंतर्गत उचललं आहे. आता हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर (Google play store) मधून डाउनलोड करता येणार नाही. मात्र तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप असतील तरी ते डिलीट करा.
यात 30 पेक्षा अ‍ॅप्स आहेत जे धोकादायक म्हणून काढून टाकण्यात आले आहेत. यातील बरेचसे अ‍ॅप हे थर्ड पार्टी सेल्फी अ‍ॅप आहेत. सिक्यूरिटी रिसर्चर WhiteOpsनं दिलेल्या माहितीनुसार, ये अ‍ॅप युझरची फसवणूक करतात. या अ‍ॅप्समध्ये कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास जाहीराती किंवा इतर वेबसाइट ओपन होतात. यातून फोनमध्ये व्हायरस येण्याचीही शक्यता असते.>Pand Selife Beauty Camera -50 हज़ार
>>Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera- 10 लाख
>>Benbu Seilfe Beauty Camera- 10 लाख
>>Pinut Selife Beauty and Photo Editor -10 लाख
>>Mood Photo Editor and Selife Beauty Camera -5 लाख
>>Rose Photo Editor and Selfie Beauty Camera-10 लाख
>>Selife Beauty Camera and Photo Editor-1 लाख
>>Fog Selife Beauty Camera- 1 लाख
>>First Selife Beauty Camera and Photo Editor- 50 लाख
>>Vanu Selife Beauty Camera - 1 लाख
>>Sun Pro Beauty Camera- 10 लाख
>>Funny Sweet Beauty Camera- 5 लाख
>>Little Bee Beauty Camera- 10 लाख
>>Beauty Camera and Photo Editor Pro- 10 लाख
>>Grass Beauty Camera- 10 लाख
>>Ele Beauty Camera- 10 लाख
>>Flower Beauty Camera - 1 लाख
>>Best Selfie Beauty Camera- 10 लाख
>>Orange Camera- 5 लाख
>>Sunny Beauty Camera - 10 लाख
>>Pro Selfie Beauty Camera -5 लाख
>Selfie Beauty Camera Pro - 10 लाख
>>Elegant Beauty Cam-2019 -50 हज़ार
WhiteOps ने दिलेल्या माहितीनुसार बर्‍याच प्रकरणांमध्ये असेही आढळून आले आहे की युझरनं हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर ते डिलीट होत नाहीत. हे अ‍ॅप्स केवळ लोकांना जाहीराती दाखवतात. तज्ज्ञांनी असेही म्हटलं आहे की यातील बरेच अ‍ॅप्स डिलीट करण्यापूर्वी सुमारे 17 दिवस प्ले स्टोअरमध्ये असतात.


0 

Share


टाईम महाराष्ट्र
Written by
टाईम महाराष्ट्र

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad