Bluepadटाईम महाराष्ट्र न्युज-India China Face Off | सीमेवर घुसखोरी झाली नाही, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न!
Bluepad

टाईम महाराष्ट्र न्युज-India China Face Off | सीमेवर घुसखोरी झाली नाही, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न!

टाईम महाराष्ट्र
टाईम महाराष्ट्र
20th Jun, 2020

Share

भारत-चीन सीमेवरच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी काल सर्वात मोठं वक्तव्य केलं. आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला आहे. सर्वपक्षीय बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं, पण या वक्तव्यामुळे उत्तर मिळण्याऐवजी नवे प्रश्नच निर्माण झाले आहेत. त्यावरुन राजकारणही सुरु झालं आहे.भारत-चीन सीमेवर नेमकं झालंय तरी काय, कशी झाली ही घटना हे सगळे प्रश्न देशाला पडले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सीमेवरील हिंसक झटापटीबाबत वक्तव्य समोर आलं. देशातल्या 20 राजकीय पक्ष प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, "आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला." पण या वक्तव्यात आणि सरकारच्याच अनेक वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहेत. कारण गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाचं जे अधिकृत वक्तव्य आलं होतं त्यात याच्या बरोबर विरोधी सूर आहे.
दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घटनेनंतर फोनवर बातचीत झाली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने हे वक्तव्य जाहीर केलं होतं. 6 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव करण्याबाबत दोन्ही देशांच्या मिलिट्री कमांडरची बैठक झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती. पण ही प्रगती दिसत असतानाच चिनी बाजूने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत एक बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावरुनच वाद सुरु झाला आणि नंतर चीनने आधीच कट केल्याप्रमाणे ही हिंसा घडवली.आता पंतप्रधान म्हणतात ते खरं की परराष्ट्र मंत्रालय म्हणतं ते खरं हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण घुसखोरी न करता आपल्या हद्दीत चीन कसं काय बांधकाम करत होता? मोदींच्या वक्तव्यानंतर राहुल गांधींनीही दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.1 

Share


टाईम महाराष्ट्र
Written by
टाईम महाराष्ट्र

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad