आपण पहातोय की स्त्री हि प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. ती प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करून दाखवत आहे. एखाद्या छोटया नौकरी पासुन ते आपल्या देशाच्या राष्ट्रपती पर्यंत महिला आहे. हि आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे की देशाची राष्ट्रपती महिला आहे.
तरी पण मुलगी जन्माला आली की कुठतरी असं वाटतं की मुलगा पाहिजे होता. मग एकविसाव्या शतकामध्ये असताना आणखी हा भेदभाव का,
म्हणुन तिच्या शब्दात काही ओळी..
*जन्माला येऊद्या तुमच्या घरी*
मी आहे सुंदर नारी
मी आहे बाबांची लाडकी परी...
येईल लक्ष्मी म्हणुन तुमच्या दारी
म्हणून जन्माला येऊदया तुमच्या घरी.
आई म्हणुन लाड पुरवणारी मी...
बहिन म्हणून प्रेम करणारी मी...
बायको म्हणुन आधार देणारी मी...
सुन म्हणुन मन जपणारी मी...
म्हणून जन्माला येऊदया तुमच्या घरी.
मुलगी म्हणुन जन्माला येणं,
मला कधी कधी वाइट वाटतं...
कारण मी जन्माला आल्यावर
कोणीच कसं आनंदी नसतं...
मुलगी म्हणून जन्माला येणं
माझ असेल का मागच्या
जन्माच पाप...
कारण माझ्याच आई- वडिलांना
वाटतो माझ्या लग्नाचा ताप...
बाबा मला आहे तुमच्या
परिस्थितीची जाणीव...
नाही भासु देणार तुम्हाला
वंशाच्या दिव्याची उणीव...
सगळेच सांगतात सुंदर आहे जग...
कशाला मारता जन्माच्या आधी मग..
मी पण करेल खुप प्रगती...
देशाच्या विकासाला देईल मी गती...
म्हणुन नका करू माझी
जन्माला येणाच्या आधी माती...
बाबांची सुंदर परी...
जन्माला येऊदया तुमच्या घरी.
By.
गणेश चव्हाण ब्रम्हपुरीकर.