प्राचीन काळापासून तर आजआधुनिक काळापर्यंत जगात सर्वच क्षेत्रात आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,वैचारिक,सांस्कृतिक अशा सर्व बाबतीत बदल होतं आहे. हे बदल काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतात.त्या बदलत्या जगाचा एक भाग आपणही व्हायला हरकत नाही.पण ते बदल आपल्या ध्येय धोरणाशी,नीतीमूल्याशी साजेशी असली पाहिजे.
जगात जसे परिवर्तन होतं आहे ,त्या परिवर्तन /बदलाचा परिणाम पक्षी,प्राणी,मानव आणि निसर्गावर सुद्धा झाला आहे.त्याला कारणही आहे,मानवाने आपल्या अवास्तव्य,कधीही उपयोगी नाही पडणाऱ्या गरजा,आशा-आंकांक्षासाठी त्यांच्या वास्तव्यावर अतिक्रमण होतं आहे.
जगात होतं असलेले बरेच बदल ही काळाची गरज होती आणि आहे.परंतु अनेक असे बदल आहेत,ज्याची तीळ मात्र आवश्यकता नाही.तरी वेगळ्या वैचारिकधारेतून विकासाच्या नावाखाली बदल घडविण्याचा प्रयत्न होतं आहे आणि ते अनावश्यक वाटत.
आज सर्व क्षेत्रात बदल होतं आहे.ही आनंददायी बाब आहे.परंतु असे काही क्षेत्र आहेत,ज्या क्षेत्रातून वैचारिकता,स्वावलंबन,आत्मनिर्भर,सत्याची,नितिमूल्ययाची शिकवण मिळत होती.ते वैचारिक क्षेत्र अल्पशा कमी होतं चाललंय अस वाटत.