रे हेल्थ कॉन्शस लोकांनो
इकडे लक्ष द्या हो
रासायनिक खतयुक्त शेतमाल
खरेदी करू नका हो
रसायनांनी पिकविलेली फळफळावळ
कितपत योग्य ?आहे का आरोग्यवर्धक
शरीरात घुसून हि रसायने
अख्खा शरीराला काढतात पोखरून
अहो खाताना खाताय फळे कडधान्ये डाळी
असा होतोय भास उलट तुम्ही शरीराला देताय स्लो पोईंजनिंग
माहितेय का साहेब मॅडम
कच्ची फळे पिकतात कशी एकदम ?
कॅल्शियम कार्बाईड कार्सिनोजेन
कार्बाईड आर्सेनिक फॉस्फोरस
इथाईल गॅस एसीटीलिन गॅस
इथेफॉन आबासायसिक एसिड
हे जाते फळाद्वारे शरीरात
एन पी के युरिया कॅल्शियम अमोनियम नायट्रेट
अमोनियम सल्फेट झिंक सल्फेट मँगॅनीज
बोरॅक्स रॉक फॉस्पेट
हे जाते कडधान्यांद्वारे शरीरात
अबालवृद्ध सगळेच होतात रोगग्रस्त
कॅन्सर न्यूरोजीकल डिसऑर्डर
मेमरी लॉस निद्रा नाश
त्वचा डोळे तोंडात सूज
हाय डायबेटिज डायलेसिस पर्यंत
आग्रह करा नैसर्गिक शेतमालाचा
निर्णय हि बळीराजाच्या हिताचाच
चार पैसे जास्त मोजा पण !
दीर्घायुषी व्हाल आनंददायी आरोग्यमय जीवन जगाल
हसत हसत रमत गमत जगाल
आजपासून से नो ट्यु केमिकली रायपनड फ्रुट्स
केमिकली प्रोडयुस्ड ऍग्रीकल्चर यील्ड
येणाऱ्या पिढ्याना द्या शिकवण
नेचरल फार्मिंग शेतमाल फळफळावळ
कवि रामचंद्र गोपाळ राणे मुक्काम पोस्ट पेंडूर
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
विनंती करतो हात पाय जोडून
पोटतिडकीने मनापासून