सुरु केला धंदा
लोकांनी केली निंदा
मी विचार केला लोक कोण ?
उपाशी राहिलो तर भरणार ते पोट ?
पडलीय दुनिया सगळी
अरे मार्केटिंग शिक भावा शंभर लोकांना भेटा
नव्वद नकार पचवा दहा होकार मिळवा
ह्याने नाही साथ दिली त्याने नाही
साथ दिली शेजाऱ्यांनी नाही
घेतले नातेवाईकांनी नाही
घेतले हि झाली न कर्त्यांची रडारड
होय रडारड आपल्यात आहे दम
मग कुणाला कशाला घाबरायचे संकोचायचे
स्वतःला झोकून द्यायचे
एकदा पैसे लागले खुळखुळू तुमचे
मानपाखरू लागेल उडू उडू
आकाशाची त्याला नसेल सीमा घे
गरुडभरारी मराठी तरुणा रे
लाज शरम खानदान कि इज्जत
इभ्रत स्थान परंपरा विसर
एक वेळ उपाशी मरशील
लोक येऊन नाहीच भरवतील
आयुष्य तुझं तूच जगायचंय
कुणाला नाही पडलीय
बेस्ट ऑफ लक