Bluepad | Bluepad
Bluepad
सुर्य तळपला म्हणून समुद्र अटत नाही तसं लोकनिंदेला भिक घालून आपलं कार्य थांबवु नका
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
19th Mar, 2023

Share

*सुर्य तळपला म्हणून समुद्र अटत नाही तस लोकनिंदेला भिक घालून आपलं कार्य थांबवु नका*
आपण आपल्या जीवनातील बहुतांश वेळा हा इतरांच्या आपल्या विषयी असणार्या मतांवर चिंतन करण्यासाठी घालवतो . मुळात हि आपली सवय पद्धत चुकीची आणि आपल्यासाठी अहितकारक आहे.आपण आपलं कार्य प्रमाणिक आणि निष्ठापूर्वक करणं गरजेचं आहे.बाकी त्या कार्य विषयी निर्माण होणारी मत हि आपण दुर्लक्षित करण हेच आपल्यासाठी लाभकारी आहे.आपण करत असलेल्या कार्याचा मार्ग सत्यनिष्ठ लोक हितकारक , असेल तर इतरत्र आजुबाजुला येणाऱ्या प्रतिक्रिया यावर फारसा लक्ष देऊ नका आणि आपल्या कार्यापासून भटकु नका लोक निंदा हि एक विशिष्ट कालावधी मध्ये होतच असते . सुर्य कितीही जरी तळपला म्हणून काय समुद्र अटतो का ? समुद्र आपल्यावर सुर्याच्या तळपण्याचा परिणाम करून घेत नाही.तसच आपण सुद्धा लोक निंदेला घाबरून आपलं कार्य थांबवु नये. नकारात्मक विचार शक्यतो आपल्या आजूबाजूला फिरकता कामा नये . नकारात्मकता हि दिशाहिन स्थिती असते . शक्यतो या स्थिती पासुन दुर राहण उत्तम लोक आपल्या बद्दल किती ही नकारात्मक बोलु द्या . आपल्याला यशस्वी होयच असेल तर आपण तिकडे लक्ष देवू नये.आपण आपलं जीवन आपल्या कर्म फलानुसार जगत असतो .मग इतरांच्या मतानुसार आपल्या मध्ये बद्दल अथवा मतानुसार प्रभावीत होण्याची आवश्यकता नाही.सुर्य तळपला म्हणजे समुद्र आटत नाही लोक निंदा हि लोकांचं त्यांच्या विवेकानुसार मत असता आपण त्याच चिंतन अथवा मंथन करण्याची अजिबात आवश्यकता नाही.पण आपण हे समजुन घेण्यात गोंधळतो आणि आपल्या कार्या पासुन अनेक वेळा दुर होतो . निंदानालस्ती ,टवाळी ,टिंगल झाली तर फार काही घाबरायचे काम नाही. पण या वेळी मात्र आपला रथ हा सत्याच्या मार्गावर असला पाहिजे.आपलं आयुष्य हे आपलं असतं . आपल्या अस्तित्वा पेक्षा या जगात काहीच मोठं नाही. आयुष्यच्या मार्गावर आपण चालताना सत्याचा न्यायाचा धर्माचा मार्ग सोडायचा नाही या मार्गावरून मार्गक्रमण करताना आपण एखाद कार्य मग ते आपल्या स्वतःसाठी असेल अथवा लोक कल्याणकारी असेल. नैसर्गिक न्याय धर्माच पालन करणार तसेच निति मुल्य संवर्धन करणार असेल तर अशा कार्याला कितीही विघ्न संकटं आली अडचणी समस्या निर्माण झाल्या तरी सुद्धा असं कार्य चुकुन सुद्धा थांबवु नका .लोक निंदेला घाबरून तर नक्कीच नाही .जसं समुद्राच्या विराटतेसमोर किती ही विघ्न निर्माण झाली.वादळ सुटली एव्हण सुर्य जरी आग ओकू लागला सुर्यने कितीही प्रखर आणि दाहक उष्णता उत्सर्जित केली तरी समुद्राला याचा काय परिणाम होऊ शकतो का ? तर यत्किंचितही नाही महणजे समुद्र आपल्या ठिकाणी स्थिर आहे.कोणत्याही बाह्य शक्तिचा प्रभावाचा परिणामाचा समुद्राच्या अस्तित्वावर होणार विपरीत परिणाम होत नाही.तसच आपल्या जीवनात सुद्धा असलं पाहिजे आपण जेव्हा एखाद्य लोक उपयोगी अथवा स्वतःचा उत्कर्ष होण्यासाठी किंवा मनातील सुप्त इच्छा नुरूप कार्य हाती घेतो . तेव्हा त्या कार्य बद्दल चांगले वाईट अभिप्राय मिळु शकतात ते मिळण तसं कठीण नाहीच . त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला लोक निंदेला समोर जावा लागु शकत .असं योगायोगाने झालं तर आपण आपला मार्ग सोडणार का ? तर नक्कीच नाही सोडला पाहिजे.तर आणि तरच उपयोग आहे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad