अहोरात्र ट्रक चालवितो
सोबत माथाडी क्लिनरचीच
गावोगावी भारतभर रात्री अपरात्री फिरणं
साधं सुध नाही सुसाट
आम्हाला नाही भेटत वाटेत
भूत खेत आत्मे बित्मे हडळ खवीस
आमचे काम वेळेवर डिलिव्हरी
समोरून मेहेनताना मिळायची असते हमी
पाळतो थोडा आम्ही अंधविश्वास
लिंबू मिरची लटकवितो नारळ फोडतो
नको कोणतीच बाधा थेट रस्त्यात यासाठीहे
अन मग क्षणात ट्रक चालवितो वेगात
हातावरती पोट थोडी जोखीम हवीच