आम्ही वाहतूकदार
घेऊन जातो माल दूरवर
आपल्या दिमतीस कोण ? कोण ? बरं
माथाडी , ड्रायवर अन क्लिनर
सोबत बाबू बिलटी बनविणार
सुरक्षित माल घेऊन जाण्यास तयार
जबादारी घेतो आम्ही जबाबदार
ऊन वारा पाऊस वादळ
३६५ दिवस अहोरात्र नाही उसंत
ब्रेकडाऊन ,ब्रेकफेल ,पंक्चर
धक्का स्टार्ट , इंजिन गरम आणि बरेच
हर एक करतो प्रॉब्लेम फेस
जेवणखाण ढाब्यावरच
पण माल पोहोचवतो अगदी वेळेत
साहेब आमचे या सर्व्हिसवरच आहे पोट
टायमाची बक्षिसी मिळते ती वेगळीच
ऑनलाईन खरेदीमुळे आम्ही अति व्यग्र
आमच्याशिवाय भारताची प्रगती अशक्य
अहो आम्ही आहोत लोकशाहीचीच चाकं