गुदमरलेल्या या जीवनी हवा मजला मोकळा श्वास
आतूरलेले हे मन माझे शोधी नवी पहाट
विझलेल्या या दिव्याला हवी आता नवी वात
दाटलेल्या या नयना मध्ये आहे अजूनही आस....
गुदमरलेल्या या जीवनी हवा मजला मोकळा श्वास
बुडालेल्या नौके ला हवा नविन काठ
वाटेवरील काट्यांचा नको आता थाट
विखुरलेल्या स्वप्नांना ही नवा ध्यास....
गुदमरलेल्या या जीवनी हवा मजला मोकळा श्वास
मोकळा श्वास......