रात्री आकाशी बघताना मनात पोकळी भासते
दूर कुठेतरी एक चांदणी प्रथमच गगनी दिसते.
यापूर्वी गगनात ही चांदणी कुठेच नव्हती
मनाच्या कप्प्यातही कुठेच पोकळी नव्हती.
नियतीने केला घात तो बघत राहिला
तिने दिलेल्या यातना तो भोगत राहिला.
वचनबद्ध होता संसार, ती मोडून गेली
दूर गगनात तिथे चांदणी बनून गेली.