खरंच परिस्थिती माणसाला बदलण्यात भाग पडते.... आज पुन्हा एक नवीन लेख घेऊन आली.... अपेक्षा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल..... कसं असतं ना की आपण एखाद्या गोष्टी कडून खूप अपेक्षा ठेवली आणि काही काळानंतर ती अपेक्षा भंग झाली तर आपण पुन्हा कधीच कुणाकडून तशी अपेक्षा करत नाही आणि आपण आधीच त्या गोष्टी साठी सतर्क राहतो..... माझी कहाणी तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे.... पण तुम्हाला माहिती आहे का जे माझ्या आयुष्यात up's and down आलेत त्या गोष्टींनी मला खूप काही शिकवलं...... मी आधी किती मूर्ख होती हे मला या सगळ्या परिस्थिती ने दाखविले .... खूप रडले, एकटी पडले, सगळे संपल्यासारख वाटायला लागले..... पण आता अस आहे की मला कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटत नाही..... कोणी काही बोलले तर ऐकून घेते, कोणी म्हटल तू चुकली तर त्यांना हो म्हणते आणि कोणी म्हटल तू मूर्ख तर मी मूर्खच आहे म्हणते..... भांडण करायला सगळे तयार आहेत पण त्यांना काही पॉइंट मिळत नाही आहे कारण त्यांनी जे गोष्ट बोलले त्या गोष्टीत मी होकारार्थी असते....पण एक secret सांगू का.... मला याचा खूप फायदा होत आहे म्हणजे मी prepare आहे की आपण आयुष्यात फक्त एकटे आहोत... स्वतःला कसं सांभाळायचं आणि स्वतःमध्ये कसं आनंदी राहायचं हे हूनर आता जमायला लागले... जो विश्वास तोडेल त्याला पण प्रेम आणि जो सोबत राहील त्याला पण..... फरक फक्त एवढाच की आता अपेक्षा कोणाकडून नाही.... आता अस वाटते की आपण असं जगायला हवे होते.... बिंदास्त.... एकटे.....आणि महत्त्वाचे आनंदी....