सगळ्यांना सांभाळता सांभाळता
स्वतःला सांभाळायचं राहून जात .
सुटेल सुटेल म्हणता म्हणता
कोड जास्तच गुरफटत जातं.
समजूतदार असणं आपलं
आपल्यालाच महागात पडत.
चुका कोणाच्याही असोत
खापर आपल्याच माथ्यावर फुटतं.
अर्थाचे अनर्थ होतात. गैरसमज वाढत जातात.
पण बोलायची सोय मात्र आता उरलेली नाही.
कधी कोण काय करणार याचा आता भरोसाच राहिलेला नाही.
साधं सरळ असणं फार चांगलं नाही जश्यास तस वागणं स्वभावात बसत नाही. करावं तर काय करावं पेच काही सुटत नाही..नक्की वागायचं तरी कसं आजपर्यंत कळलंच नाही. कळलंच नाही .