💐 अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे शरदभाऊ वानखडे पाटील. ........🙏 यांच्या वाढदिवसानिमित्त......
🙏 अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील टाकळी खोजबळ या गावामध्ये राहणारे शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातून येऊन ,अकोला येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कार्यरत असलेले अंधश्रद्धा निर्मूलनांचे काम करत असलेले विदर्भ संघटक शरदभाऊ वानखडे हे आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाद्वारे विदर्भ स्तरावर काम करीत असलेले सध्या जी . प.नगर ,खडकी बु. अकोला येथे राहत असलेले बायपास हायवे टच हॉटेल नैवेद्यम सुरू केलेले अकोला जिल्ह्यातील जुने जाणते अंधश्रद्धा निर्मूलन सोबत सामाजिक कार्याने सुपररीचित असलेले अंधश्रद्धा निर्मूलन सोबतच अनेक सामाजिक काम करीत असलेले आमचे प्रिय मित्र, सखा , मार्गदर्शक, वक्ता, उत्कृष्ट संघटक ,स्पष्टवक्ते , अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक ते विदर्भ संघटक व आता रीटार झाल्यावर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणारे संस्थापक अध्यक्ष, प्रा. शाम मानव प्रणित अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे समर्थक ज्येष्ठ समाजसेवक, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड , सत्यशोधक चळवळ ,शेतकरी चळवळ, व अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे व प्रेरणा देणारे अनेक संघटनेच्या माध्यमातून शरदभाऊ वानखडे पाटील यांनी तरुण वयापासूनच समाजकार्याची आवड असलेला सामाजिक कार्यकर्ता आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून आपले समाज कार्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करीत आहे.शेती, युवक, महिला, बेरोजगार, बँकेचे पीआरओ, अंधश्रद्धा निर्मूलन,आदी विविध विषयाला धरून त्यांनी अनेक कामे केली आहे .समाजकारण- करीत असताना त्यांनी कोणतेही प्रकारे भेदभाव न पहाता जिल्ह्यातील अनेक तरुण तडफदार युवक युवती अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी जोडले आहे. आमच्या सारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते या चळवळीशी जुळण्यासाठी शरद भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे .शाहू, फुले ,आंबेडकर गाडगे महाराज ,तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज व श्याम मानव यांच्या विचाराचा वारसा घेऊन ते वयाच्या तीसाव्या वर्षापासून समाज
कार्याला त्यांनी सुरुवात केली असून आजतागायत त्यांचे हे कार्य सातत्याने चालू आहे. आपले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नोकरी सांभाळून ते सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी कामाचा मोठ्याप्रमाणात झपाटा लावला होता व त्या माध्यमातून अनेक युवक ,महिला नागरिकांना संघटनेशी जोडून त्या माध्यमातून अनेक मोठमोठे कामे पार पाडली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने व सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक प्राध्यापक शाम मानव प्रनित अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे विदर्भ संघटक म्हणून त्यांनी मोठ्या हिमतीने सातत्याने काम केले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असलेल्या या अकोला जिल्हा मध्ये परिवर्तनवादी, बहुजनवादी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था संघटनेसोबत ते जूडून सातत्याने कार्य करीत असतात. आपली नोकरी ,घर संसार परिवार सांभाळून मिळेल तेवढा वेळ ते सामाजिक कार्यासाठी देत असतात व समाजाबाबतचे आपले समाजऋण हे फेळण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत असतात . एवढ्या मोठ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीवर असताना सुद्धा त्यांचा सामाजिक कार्याचा बाणा मात्र त्यांना स्वस्त बसू देत नाही. हा एवढा मोठा सगळा व्याप असतानाही सामाजिक कार्यात ते प्रत्येक वेळेस हिरारीने भाग घेऊन आपले योगदान तन-मन-धनाने देत असतात . त्यांचे अनेक वर्षांपासून ते सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक कार्य , लेखक, वक्ता , उत्कृष्ट संघटक म्हणून सातत्याने काम करीत आहेत. या आधी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. आदी अनेक चळवळ अकोला जिल्ह्यात पसरवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी त्यांची भूमिका ही महत्त्वाची होती. त्यांनी वेळोवेळी आंदोलने उपोषणे, मोर्चे केलेले आहेत. अनेक बुवा बाबाचा अनेक वेळा भंडाफोड करून अनेक डुप्लिकेट बाबांना अकोला जिल्ह्यातील सडो की पडो करून सोडलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जुडून प्राध्यापक श्याम मानव यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्राध्यापक शाम मानव यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. अनेक अभियान राबवले आहेत व अनेक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करून ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत . गावा, गावामध्ये असलेला अंधश्रद्धा थांबवण्यासाठी गाव तेथे शाखा व अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बाबत जनजागृती, जाहीर सभा अंधश्रद्धा निर्मूलनाचे जाहीर व्याख्यान, जाहीर सभा, कार्यशाळा घेऊन लोकांमध्ये जनजागृती निर्माण केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन यांची चळवळ अकोला वाशिम बुलढाणा अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवावी म्हणून त्यांनी नेहमी अनेक आंदोलने केली आहेत. धरणे, मोर्चे, उपोषणे, रास्ता रोको आंदोलन, आदी विविध आंदोलने करून नेहमी सहकार्य केले आहे. ग्रामीण वंचित लोकांना संघटित करून संघटनेच्या माध्यमातून त्यांना सातत्याने न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यांनी शासनावर दबाव आणून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. स्पष्टवक्तेपणा, कायद्याचा परिपूर्ण ज्ञान, व समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, चीकाटी, प्रचंड मेहनत कोणतेही काम एकदा करण्याचे ठरल्यानंतर त्याचा पाठपुरावा कसा करावा ते कसे करून घ्यावे हे जर शिकायचे असेल तर शरदभाऊ यांच्याजवळून शिकले पाहिजे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजातील अडला नाडल्या गरजवंतांना गोरगरिबांना नेहमी सेवेचा हात देणारे खरोखरच माझे मित्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख हार्दिक शुभेच्छा अभिष्टचिंतन🙏 तुम जियो हजारो साल साल के दिन हो लाखो हजार साल 🙏मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा सह त्यांच्या या सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा करतो. भाऊंचा मोबाईल नंबर/. 🚩 ९८२२२२१८५२.👍 ..आपलाच स्नेही मित्र. 🚩 गजानन ओंकार हरणे . खडकी ,अकोला. समाजसेवक व पत्रकार तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन . उपाध्यक्ष अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला जिल्हा 🙏. संवाद 🚩 ९८२२९४२६२३ . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍.