हे शंकरा हे मालका तव चरणांची आम्ही धूळ रे
जाऊ कुठे हो दूर मी , आम्ही आपलीच लेकरे ।
दुर्जना संहार तू या सज्जनांना तार रे ,
लागली माज्या मनास शंकरा ही आस रे ।।
लावूनी तू समाधी बैसलास मठात,
भक्तांच्या ह्या बालकांच्या आहेस रे मनात ।।
टपोऱ्या तव डोळ्यांत सारे ब्रम्हांड हे व्यापले
तव चरणात आम्हास रे सारे विश्व हे दिसले ।।
मायाळू तू माय रे प्रेमळ तू बाप रे
साऱ्या विश्वाचा अन सृष्टीचा तूच विधाता रे ।।।