एक टक्का जरी नासाडी थांबता आली तरी कुपोषण मुक्ती होईल
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
18th Mar, 2023
Share
*एक टक्का जरी अन्न नासाडी थांबता आली तरी कुपोषण मुक्ति होईल*
कुपोषण मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न चालू असले तरी अजुनही पाहिजे तसं यश आलं नाही . कुपोषणाच्या संदर्भात अन्न हाच मुख्य घटक आहे. आपल्या कडे दैनंदिन होणा-या अन्न नासाडी पैकी एक टक्का अन्न नासाडी थांबली आणि हे अन्न कुपोषण मुक्तीसाठी वापरता आलतर कुपोषण कुठेही दिसणार नाही. एकीकडे आपण कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाऊन नासाडी होत आहे.मग ह्या सगळ्या मध्ये योग्य नियोजन हेच प्रभावी माध्यम आहे.धान्य साठा नाही अथवा धान्य उपलब्ध नाही अशी परिस्थिती सध्या अजिबात नाही पुढील काही वर्षे पुरेल एवढ धान्य शासकीय गोदामात पडुन आहे.कधी कधी हेच धान्य खराब होत आणि खराब होऊन खान्या योग्य राहत नाही . अन्न उपलब्ध नाही म्हणून आहारावर व पर्यायाने शारीरीक रचनेवर परिणाम झाला तर त्याला फार पर्याय उपलब्ध नाहीत. पण प्रचंड प्रमाणात धान्य उपलब्ध आहे रोज कितीतरी टन अन्न वाया जात आहे. प्रचंड प्रमाणात अन्न वाया जात असताना देखील कुपोषण असणं खूप गंभीर आहे. अल्प प्रमाणात जरी आपण अन्न नासाडी थांबवुन ती गरजु व्यक्ति पर्यंत पोहचू शकलो तरी कुपोषण संपुष्टात येईल.पन्नास वर्षे अगोदर अन्नाचा दुष्काळ होता .हे कोणीही नाकारू शकत नाही ती वेळ काळ परिस्थिती ज्यांनी अनुभवली त्यांच्या तोंडून कैफियत ऐकताना मन हेलावून जातं तशी बिकट परिस्थिती आज तरी नक्कीच नाही.पण आजच्या परिस्थितीत अन्न हे प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. लग्न समारंभ असो अथवा खाजगी समारंभ अथवा उपहारगृह ,भोजनालय अनेक ठिकाणी संख्या गृहित धरून भोजन बनवलं जातं आणि शेवटी खूप मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात.एकीकडे आपण कुपोषणाचा सामना करतोय तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात अन्न वाया घालवतोय. आपण कुपोषणा सारख्या भायानक समस्येला सामोरे जातोय म्हणजे आपल्या कडे प्रचंड प्रमाणात अन्न असुन देखील नियोजन अभावा मुळे आपण कुपोषण विळख्यात आहेत. साधारणतः आपल्या वडीलांचा आजोबांचा काळ मोजला तर अन्न हि समस्या किती भिषण होती याचं वास्तव आपल्या समोर येईल. शिळ्या भाकरी खाऊन एक एक दोन दोन दिवस उपाशी राहून माणसं शिकली घडली टिकली . एक वेळेच अन्न मिळाव म्हणून दिवसभर काम आणि तेही राबराब राबायचे दिवस ते अन्न टंचाई त्या वेळी खुप भिषण होती . अन्न पदार्थ आज आपण जे पाहतोय त्या वेळी हि कल्पना पण नसेल फार फार भाकरी पलिकडे लोकांना काही माहित नव्हतं.आज प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध आहे पण आपल्या कडे अस्तित्वात असणारी विषमता एवढी टोकाची आहे कि एका बाजूला दैनंदिन प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाऊन नासाडी होत आहे.आणि दुसरया बाजुला अन्न नाही म्हणून कित्येक लोक उपाशी पोटी झोपतात कित्येक अन्न वेळेवर आणि परिपूर्ण मिळत नाही म्हणून कुपोषणाचे शिकार होतात. आणि एका बाजूला दैनंदिन प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात आहे .गरजु पर्यंत अन्न पोहचलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तिची एक विशिष्ट अशी अन्न गरज असते .ते अन्न त्याला मिळालं पाहिजे.विशेषता वाया जाणार जे अन्न आहे त्याच योग्य नियोजन करता आलं तर कुपोषण हि समस्या अजिबात दिसणार नाही.मुळासह कुपोषण संपुष्टात येण्यासाठी प्रभावी जनजागृती सोबत अन्न योग्य प्रमाणात प्रत्येकाला मिळालं पाहिजे.वाया जाणार अन्न थांबवून तोच घास गरिबांच्या तोंडात भरवला तर लाभच होईल. आता जे आपण कुपोषण समजतोय अथवा उपासमार समजोय हि संपुष्टात येण्याच्या दृष्टीने वाया जाणार अन्न अथवा अन्न नासाडी थांबता आली पाहिजे आणि तेच अन्न इकडं वापरता आले तर कोणीही उपाशी पोटी राहणार नाही.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक