Bluepad | Bluepad
Bluepad
भगवंताचे स्मरण कसे करावे .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
18th Mar, 2023

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 भगवंताने दिलेल्या पंच ज्ञानेंद्रिये , पंचकर्मेद्रिये आणि मन इश्वरी सेवेत लावून भक्ती केली पाहिजे . पंच इंद्रिये संयमित ठेवणे आणि पंच ज्ञानेंद्रिय संयमित ठेवणे हे मनाने शक्य आहे . मनाला ह्रदयात स्थिर करुन मन इतरत्र भटकूवू नये . प्राण मस्तकात धारण करुन मन स्थिर करावे . इंद्रियांनी कोणतीही क्रिया करु नये . सर्व इंद्रियाचे मनांतील भाव नाहिसे करावे . मन निर्विकल्प अर्थात मनांत कोणतेही संकल्प विकल्प रहीत ठेवावे . स्व चे अस्तित्व नाहीसे करुन निर्गुण निराकार निर्वीकल्प अवस्था धारण करणे हेच भगवंताचे स्मरण आहे . ही एक उच्च कोटीची साधना आहे .सहज सुलभ अशी आहे . केवळ ईश्वरच परिपूर्ण आहे .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
१८/०३/२०२३
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
भगवंताचे स्मरण कसे करावे .

0 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad