Bluepad | Bluepad
Bluepad
वळीव नजरेतला
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
17th Mar, 2023

Share

वळीव नजरेतला
हजारदा आला शब्दं ओठांवर
पण कंठ स्वर फुटला नाही
काळजात बसला मुखडा तुझा
तवपासून डोळा मिटला नाही...१
अलगद भिनलीस नजरेत तू
आता संयम उरला नाही
पर्वा कुणाला काळाची आता
काहूर मनातला संपला नाही....२
किती प्रतिक्षा ती मिलनाची
का तूज इशारा कळला नाही
वाटेवरचा वाटसरू मी तुझ्या
वळीव अजून बरसला नाही .....३
कवि अटलविलास

0 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad