माझा माझ्याशीच होऊ दे संवाद एकटं रहायचय अजिबात कोणी नको. आता गर्दी नकोशी वाटते फक्त मी आणि मी कारण आम्ही पण तो मी खूप काही शिकले टीव्ही नकोसा वाटतो,संगीत जवळचं वाटतं ,दुसऱ्याने लावलेला मोबाईल कटकट वाटते, स्वतः तास न तास मोबाईलवर असताना फक्त इन्फॉर्मशन कलेक्ट करायचं फक्त एवढंच माहीत असतं आणि आपण किती अपग्रेडेड आहोत याची पुन्हा पुन्हा जाणीव निर्माण होते .प्रत्येक काम त्याला हात लावू त्याचं सोनच झालं पाहिजे खर तर नोकरी करतोय ती दुसऱ्याची पण अपग्रेड करतोय. स्वतःचं स्वतःलाच.आई म्हणते पीएचडी कर नेटसेट दे.आजच्या बायका दुसऱ्या बायांना कामाला लावून स्वतःचं भलं कसं होईल ते बघतात इथे धड नोकरी नाही पगार नाही जेमतेम मध्ये काय काय करणार? नाही मॅनेज करून स्वतःचे शरीर सांभाळ म्हणजे वय होत चालले ना काय करणार कामाचा ताण वाढत चाललाय सगळ्या डेडलाईन्स कम्प्लीट करायचे असतात. एका भूमिकेतून बाहेर पडायचं दुसऱ्या भूमिकेत शिरायचं बस एवढेच माहित आहे स्वतःसाठी वेळच नाहीये स्वतःशी संवाद कधी साधणार म्हणूनच मला एकटा राहायचं.