Bluepad | Bluepad
Bluepad
विनोदी लेखन:- आम्ही गीत संगीतकार (भाग २)
संजय ब.शिंदे.
17th Mar, 2023

Share

क्रमशः,,,,,,.
सुजय(भरत):-बरं, चला आता ह्याच्या(गाण्याच्या) मीटर बद्दल बघूया.
मीटर माहीतेय का?
संदीपान(भाऊ):-हो हो ऽऽमाहीतेय.हे बघा,सोबत घेऊन पण आलोय, बरोबर सव्वा तीन फुटाचं माप आहे.(कपड्यांच्या दुकानातील मीटर पट्टी दाखवून)
सह गीतकार(कुशल):- विजारीसाठी एक वीस तर सदर्‍यासाठी सव्वा दोन मीटर माप लागले की मग ते या कात्रीने कापा.(कात्री दाखवून).
विजय(सागर):-अरे ऽयेऽदलिंदर, कपड्यांचा मीटर नाही,गाण्याचा मीटर रे, गाण्याचा,,,,. मीटर मध्ये गाणं बसवावं लागतं ते.
संदीपान(भाऊ):-साधारण पणे किती जागा लागेल बसवायला आणि कुठं बसवायचंय,
सह गीतकार(कुशल):-बसवायचंच म्हणल्यावर खोर्‍याअन् पाटीने माती टाकून र्ॅम्प करावा लागेल,करु... काही हरकत नाही.पण कशावर बसवायचंय?.
सुजय(भरत):-अरे बिन ईडीच्या मुसळा, शेळ्या मेंढ्या अन् जनावर आहे का ते रॅम्प करायला?. गाण्याची चाल.गाणं जुळवणी करण्याची पद्धत आहे ती.
विजय(सागर):-पेटीवर(हार्मोनियम)बसवावं लागतं ते.सांगून सांगून तुम्ही हातपाय मेटाकुटीला आणले पार...
संदीपान(भाऊ)-हो,आणले की, ध्यान करुन आणले.
सुजय(भरत):-काय, काय आणले?.
सह गीतकार(कुशल):-हेच की आपलं ते,मेथा (नर भाजी) आणि कुटीला (कडबाकुटटी)हे बघा.मेथ्थाकुटीला.
सुजय(भरत):-तुम्ही दोघेजण मिरजेतून पळून इकडे आलाय का.आम्ही गाण्याबद्दल बोलतोय.
संदीपान(भाऊ)-अहो, त्याच्याबद्दल आताच काही बोलू नका,सगळी कालवा कालंव होईल,
विजय(सागर):-सुजय,बघ बरं... शब्दांचा सुर सापडतो का ते?.
संदीपान(भाऊ):-सापडतो का म्हणजे काय?सापडणारंच, अहो तुम्हाला सांगतो सुरफटीवर गेल्यावर तिथं सगळ्यांचा सुर सापडतोच.
सह गीतकार(कुशल):-नुसतं सुऽर्रऽर्रऽहांऽम्हणलं ऽरंऽम्हणऽलं ऽ की.बस .(हां हां हां हसून)......
संकल्पना आणि लेखन:-संजय बबन शिंदे.

0 

Share


Written by
संजय ब.शिंदे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad