ब्लॉग ३०९ - तुझें आहे तुजपाशी ..
काल ना मैत्रीचा फोन आला. आम्ही डोंबिवली वरून पंचवीस वर्षे एकत्र प्रवास करायचो, सगळ्या गोष्टी शेअरिंग... एकुलती एक मुलगी श्रुती शिक्षण घ्यायला ऑस्ट्रेलिया पोचली...तिथेच राहिली. आईवडील इकडे खूष....मुलगी परदेशात आहे.
वडिलांना दोन attack आले, बायपास शस्त्रक्रिया झाली, मुलगी परदेशात, इकडच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी सगळी मदत केली. लेकीला कशालाच यायला जमलं नाही...तिचे तिचे प्रॉब्लेम...पणं आई म्हणजे माझी मैत्रीण काल बोलली, ' वंदना, खरं सांगू आपण शेजाऱ्यांसठी, नातेवाईकांसाठी काय करतो, त्यापेक्षा ते आपल्यासाठी करतात ह्याचं ओझे वाटतं ग. पोटची मुलगी दोन वर्षात एकदा येऊ शकली नाही, लाज वाटते, लोकांना काय उत्तर देणार? हॉस्पिटल मध्ये आणि नंतर भेटायला येणारा प्रत्येक जण श्रुती बद्दल विचारत होता आणि मी सांगत होती ' नाही जमत आहे तिला, एवढंच '.
मैत्रिण पुढे बोलली 'काल श्रुतीचा फोन आलेला आई तुझा रिटायरमेंट फंड आणि थोडे पैसे मी पाठवते, तुम्ही डोंबिवली सोडा आणि ठाणे किँवा मुलुंड ईथे मोठं फ्लॅट घेऊया, तिथे रहा. मला यायलां जायला सोपं पडेल आणि तुम्हाला पणं मोठ्या फ्लॅट मध्ये राहता येईल जिथे सर्व सुखसोयी ( amenities) असतील लिफ्ट, सोलर वॉटर, swimming pool, गार्डन, जिम...तुम्हाला पणं बर वाटेल, lifestyle बदला जरा तुमची... वैगरे '.
मी आणि माझ्या नवऱ्याने शांतपणे विचार केला आणि तिला फोन केला, ' हे बघ श्रुती, तुझ्या हुशारी बद्दल आम्हाला अभिमान वाटत होता अजुनही वाटतो, पणं तूझ्या कर्तव्याला तू कमी पडली आमच्या बाबतीत. आज आम्ही पूर्ण फंड घालून ठाणे मुलुंड इथे घर घेऊ, पुढे काय? तू कितीशी येणार जाणार आहेस? तुला वडिलांना बघायला यायला जमलं नाही. माझा फंड घालून मी रिकामी होणार, घर तूझ्या टॅक्स साठी तूझ्या नावावर होणार, आमचं पुढचं काय? तु ह्या चार वर्षात आम्हाला एक पैसा पाठवला नाहीस, आम्हाला पणं नाही वाटलं तुझा पैसा घ्यावा. आमचं आम्ही सांभाळतो आहोत. इकडे आमची लोकं आहेत जी आमच्या मदतीला येतात, एका हाकेसरशी, त्यांना कसलीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करणारं हे आम्ही ठरवलंय. माणूस अडचणीच्या वेळेला उपयोगी येतो, तेव्हां कळतो. आज ईथे आम्हाला सुरक्षित वाटत शेजारी पाजारी, नातेवाईक चांगले आहेत...तिथे कोण आहे मदतीला? नवीन शेजारी, नविन लोकं जोडण्यात आम्हाला आता रस नाही. तुला जमलंच तरं तूझ्या पैशातून तू येऊन तुझ्यासाठी नविन घर घे, आम्हाला बरच वाटेल.....पणं आमच्याकडुन असल्या फालतू अपेक्षा करू नकोस. आमच्या दोघांच्या नंतर जो काही पैसा उरेल तो तुझा...बाकी तुझं तू ठरव.' आम्ही फोन ठेवला आणि मोकळं झालो ग...उगाच डोक्याला ताप... आयुष्यभर मुलांसाठी करतच रहायचं अस थोडाच आहे. नवीन घर मोठं घर साफ कोण करणारं? आपण ह्यांची घर सांभाळायची, का? आमचं आमचं.... बर चाललय.
मैत्रिण गेल्यावर सहजच विचार केला.... तुझें आहे तुजपाशी मग दुसऱ्याशी का पुसशी? आपले आपणच....
🙏 वंदना ❤️