Bluepad | Bluepad
Bluepad
तुच होता...
Manisha Wandhare
Manisha Wandhare
17th Mar, 2023

Share

मी कधी बोलले ना तुला ,
मनात माझ्या तूच होता ...
येता जाता भास होता ,
जागणारा क्षण तूच होता ...
अनवाणी पायात काटा बोचता ,
दुखणारी चल तूच होता ...
प्रेम स्पर्शाने काढता काटा ,
सुखावणारा स्पर्श ही तूच होता ...
प्रतिबिंब तुझं मन पटलावर ,
पुसता समोरचे चित्र तूच होता ...
आजही छळणार मला तो गुलाब ,
नकळत दिलेली भेट तूच होता ...
किती घायाळ करतो मला तू ,
मनाला घाव ही गोड तूच होता ...
सांज आजही केशरी अबोल ,
स्वतःच हरवून गाणारे गीत तूच होता ...
चकवा मला चकवणारा ,
नादावलेला सुगंध तूच होता ...
सुंदर मुक्या फुलांचा शब्द ,
रक्तचंदित सुगंधी टिळा तूच होता ...

0 

Share


Manisha Wandhare
Written by
Manisha Wandhare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad