आपण सगळेच जण बरेचं चित्रपट बघत असतो. त्यातले काही च चित्रपट आपल्याला आवडत असतात.
आवडत्या चित्रपटा पैकी काहीच चित्रपट असे असतात की ते खुपदा बघितले तरी ही पहिल्यांदा च बघतो आहे, असा फिल येतो.
आवडलेला चित्रपट कायम आपल्या मनाच्या कप्प्यात सेव्ह असतो.
मला आवडलेला चित्रपट म्हणजे सचिन पिळगांवकर ह्यांचा अशी ही बनवाबनवी हा होय.
हा चित्रपट मी कितीही वेळा बघितला तरी कधीच कंटाळवाणा होत नाही.
पुणे शहरात अविवाहित तरुणांना घर मिळवण्यासाठी किती युक्त्या कराव्यात लागतात.ते ह्या चित्रपटात दाखवले आहे.
हा चित्रपट बघताना हसुन हसुन पोट दुखायला लागत.
ह्या चित्रपटातील सगळ्यात आवडलेला सीन म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ पार्वती च डोहाळजेवण. तो सीन बघतांना हसुन हसुन डोळ्यात पाणी येत.
पार्वती ला लागलेले बीडी ओढण्याचे डोहाळे, ते हि मजेशीर आहे.
असे मजेदार चित्रपट नक्कीच प्रेक्षक वर्गाला भुरळ पाडतात.
हा चित्रपट बघुन आल्यानंतर कित्येक दिवस आम्ही ह्या चित्रपटा विषयी बोलत होतो, चर्चा करत होतो.
मला आठवतं माझी आजी अशी ही बनवाबनवी हा चित्रपट बघण्यासाठी खास गावाहून नागपुर ला आली होती.
असे चित्रपट बघताना काही तास आपण आपले दुःख चिंता बाजूला ठेवून आपण त्या चित्रपटात अगदी रममाण होऊन जातो. आणि त्या चित्रपटाचा मन मुराद आनंद लुटतो.
हो. न.
अरूंधती धर्माधिकारी कुंडले
भुमकर नगर
वाकड पुणे