स्वतःला शोधताना... स्वतः तून निसटताना.
स्वतःला शोधताना... स्वतःतून निसटताना.
जाणले ना इतुके कधी मी माझ्या स्वतःस
ना ओळखले खरे आजतागायत मी या जीवास
वाटू लागले परी आज हे का मला असे
जणू गवसले काही नवे मज स्वतःतून निसटताना...
दडला होता झरा प्रेमाचा या मनाच्या तळाशी
भावनांची ही झाली होती दाटी किती या जीवाशी
उद्वेग का अचानक परी पडला बाहेर आज हा असा
जणू गवसले काही नवे मज स्वतःतून निसटताना...
शोधले किती गवसले किती काहीच हे कळेना
का झाली घालमेल या जीवाची उगाचच आकलेना
हिशोब मांडता सारा या आयुष्याचा असा हा समोर
जणू गवसले काही नवे मज स्वतःतून निसटताना...
झाला परी नव्याने पुन्हा जन्म वाटले मज
सापडले असे काही की भासू लागले उल्हासित हे जग
भेट झाली नव्याने आरश्या समोर माझ्याशीच माझी
जणू गवसले काही नवे मज स्वतःतून निसटताना...
घ्यावा असा शोध प्रत्येकाने स्वतःचा मधून
स्वतःची पारख करून घ्यावी जोहऱ्याच्या नजरेतून
जगण्याला ही मग पडतील छानं असे पैलू किती
गवसले मज हे गुपितं नवे असेच स्वतःतून निसटताना...
डॉ अमित.
गुरुवार.
१६ मार्च २०२३.