Bluepad | Bluepad
Bluepad
मी मर्द मराठा मावळा! - मी मावळता राजा!
भाई देवघरे
भाई देवघरे
17th Mar, 2023

Share

मी मर्द मराठा मावळा! - मी मावळता राजा!
"शरद पवार" नाव उच्चारता क्षणी आपल्या समोर एक उत्तुंग कर्तृत्वाचे वलय समोर येते. मागील पन्नास वर्षे जबरदस्त राजकारणाची, लिमिटेड कोटा असला तरी सदैव सरकारमध्ये जागा मिळविण्यात अव्वल, मुसलमान धार्जिणे, दावुद इब्राहिम सहाय्यक, अत्यंत अविश्वसनीय-विश्वासघातकी, पोटातील ओठात येणार नाही आणि हृदयात काय चाललंय ते मेंदू ला पण समजणार नाही म्हणजे स्वनियोजीत राजकारणी पराकोटीची गुप्तता. सोप्या भाषेत उजव्या हाताचे डाव्या हाताला कळणार नाही इतकी गुप्तता. मोदींना सुरुवातीच्या काळात सहाय्य करणारे तर वेळप्रसंगी मोदींना धारेवर धरणारे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस सारख्या मुत्सद्दी राजकारण्यांना वेळप्रसंगी पाणी पाजणारे तर आपल्या विश्वासघातकी राजकारणाने शिवसेनेचा उपयोग करून शिवसेनेला संपविणारे, सहकार क्षेत्र वाढविणारे तर कोणी म्हणते सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार करणारे, तेलगी स्टॅंप पेपर घोटाळा २८००० कोटी चा घोटाळा २००३ साली. साल २००३ एवढ्यासाठी नमूद केले की कॉंग्रेस च्या काळात २००४-२०१४ घोटाळे लाख करोड मध्ये होत असत. तर तेलगी ने नार्को टेस्ट मध्ये छगन भुजबळ व शरद पवार ही दोन नावे घेतली होती. पण शरद पवारांचे वलय इतके मोठे की त्यातून देखील ते सहज सुटले. कोणी म्हणते की त्यांनी दावूद ला पळून जाण्यात मदत केली तर कोणी म्हणते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुळे मुंबई वाचली. मुसलमानांना वाचविण्यासाठी १२ वा बॉंबस्फोट मुस्लिम बहुल इलाक्यात झाला असे खोटे प्रसारीत केले. असे सांगणारे खुद्द शरद पवार. असो! ज्यांना जसे दिसले तसे वर्णन शरद पवारांचे केले. पण शरद पवारांवर भ्रष्टाचाराचा एक सुद्धा डाग लागला नाही. इतकी जबरदस्त पकड त्यांची राजकारणावर आहे. तर के पैसा बोलता है! महाराष्ट्रातील श्रीमंत राजकारण्यांमधील एक शरद पवार.
कॉंग्रेस मध्ये बघाल तर सोनिया गांधी, राहुल गांधी भ्रष्टाचाराचे आरोपाखाली जमानती वर बाहेर आहेत तर शरद पवारांवर एक सुद्धा छिटा भ्रष्टाचाराचा नाही. हे त्यांचे राजकारणातील कौशल्य व राजकारणातील धुर्त खेळी व राजकारणावर असणारी त्यांची पकड ह्यांचे संमिश्रीत परिणाम आहेत. मोदी स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त राजकारणी २० वर्षे तर शरद पवार भ्रष्टाचाराचा एक ही डाग नसणारी ५० वर्षांची कारकीर्द. होय! मान्य माझी मोदी-पवार तुलना ती सुद्धा भ्रष्टाचारावर अतिशय चुकीची आहे. कारण दोघांच्या संपत्तीची जर तुलना केली तर आर्थिक बाबीत मोदी रंक तर शरद पवार महाराष्ट्रातील श्रीमंत राजकारणी. तर विश्वासार्हता, हिंदू धर्म रक्षा, राष्ट्रप्रेमी, जागतिक स्तरावर भारताला नेण्याचे स्वप्न व तद्वत प्रयत्न म्हणाल तर शरद पवार रंक आणि मोदी जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी. "देश को कभी झुकने नही दुंगा" असे प्रतिपादन करणारे मोदी तर सत्तेसाठी विश्वासाला तडे देणारे शरद पवार. अशा प्रकारचे वेगवेगळे विश्लेषण शरद पवारांबद्दल पत्रकारांनी आपापल्या परीने केले. तरी पण आज देखील शरद पवार यांनी आपल्या नातेवाईकांना नौकऱ्या, धंदा पेक्षा राजकारणाला धंदा बनवून अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार अशा रक्ताच्या आप्तेष्टांना राजकारणाच्या धंद्यात आणले आणि जनतेला सेवाभाव दाखवून मेवा लुटला. असे सार्थ जीवनदर्शन शरद पवारांचे म्हणायला हरकत नाही. तर मोदी आणि योगी यांचे आप्तेष्ट, नातेवाईक आज देखील जुने जीवन जगण्यात व्यस्त आहेत. मोदी - योगी ह्यांचा तसूभरही फायदा त्याच्या आप्तेष्टांना झालेला नाही. अमित शहांनी मात्र आपला क्रिकेट चा शौक आपल्या मुलामार्फत पुर्ण करताना दिसत आहेत. तरी पण आज सुद्धा शरद पवार हे एक मान्यवर आपल्या क्षेत्रातील अनिभिषिक्त सम्राट आहेत. ज्यांचा तोड आज सुद्धा विरोधी पक्ष शोधताहेत. पण शरद पवार आहेत की ताकास तूर लागू देत नाही.
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झालेत. पण त्यांनी एकदा ही आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही. महाराष्ट्राचे राजकारण सदैव अस्थिर करण्यात धन्यता मानली. जिथे जिथे मौका मिळाला तिथे तिथे चौका शरद पवारांनी मारला आहे. व स्वतः चे हित साधण्यात धन्यता मानली. इथे "स्वतःच्या पक्षाचे हित" मानण्यात धन्यता मानली असे लिहू शकलो असतो. पण का नाही लिहिले? कारण आज अजित पवार जे ओरडताहेत की २००४ मध्ये मौका असताना शरद पवारांनी मात्र "मुख्यमंत्री" पद मला न देता तडजोड केली कॅबिनेट ची जास्त पदे मागितली आणि राष्ट्रवादी ला मिळणारे मुख्यमंत्री पद शरद पवारांनी बोली लावून निकाली काढले. कोणत्याही पक्षाला वाटेल की आपला मुख्यमंत्री असावा. पण पुतण्या नाकापेक्षा मोती जड होईल केवळ ह्या कारणास्तव श्री अजित पवारांवर आपले छत्र धरले. अजित पवार आपल्यापेक्षा वरचढ होणार नाहीत ह्याची काळजी घेतली. अर्थात त्यांना आपल्यापेक्षा मोठे होवू दिले नाही. इतिहास साक्षी आहेत की किती ही निगा राखली तरी सावली मधील झाडाची पुर्ण क्षमतेने वाढ होत नाही. अजित पवारांच्या भाष्यातून खुंटलेल्या वाढीची किलकारी आताशा बघायला मिळते आहे. शरद पवार म्हणजे जिधर फायदा - उधर हम! अशी रणनिती घेऊन राजकारणाचा स्वतः च्या फायद्यासाठी उपयोग करून घेणारा राजकारणी, अशी प्रतिमा त्यांनी बनविली. अशा प्रकारचे विश्लेषण आढळते. आणि ज्या ज्या पक्षांमध्ये वृत्तवाहिन्या मधील पत्रकार विकत घेण्याची क्षमता असते. त्यांचे फक्त चांगले गुण वृत्तवाहिन्या दाखवीत असतात. Narrative सेट करुन अशांचे गोडवे सर्वसामान्य जनतेसमोर मांडले जातात. तर BBC सारखी सर्वमान्य वृत्तवाहिनी मोदींवर चुकीचे Narrative चालवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्यामध्ये वास्तवापासून जनतेला भ्रमित करण्याचा डाव असतो. आणि म्हणूनच "पत्रकारिता" लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो त्याला आता "पत्रकारिता चौथा दंभ" नाईलाजास्तव म्हणावे लागते. मोदींनी राजदीप सरदेसाई ला चांगल्या कानपिचक्या दिल्या आहेत. जेव्हा २००२ दंग्यांवर मोदींना डिवचण्यासाठी प्रश्न विचारला त्यावेळी शांत चेहऱ्याने मोदींनी त्याचे कान टोचले, म्हणाले " इसका न्यायालयीन रिजल्ट आ चुका है, मै निर्दोष हू! लेकिन मै आपको रोकुंगा नही क्यो की इस पर (म्हणजे अशा गॉसिप वर) आपका घर चलता है!" एका झटक्यात सरदेसाई च्या पत्रकारितेची औकात झटकणारा मोदी! मोदी च्या विरोधात प्रसार करायला सौदी अरेबिया ने सरदेसाई ला ५० मिलियन डॉलर दिल्याचे वृत्त आहे. खरे खोटे देव जाणे! पण वृत्त जर खरे असेल तर भारत सरकारने ह्याच्यावर छापा टाकून संपत्तीची शहानिशा करायला हवी, एवढे मात्र खरे.
शरद पवारांना सहकार क्षेत्रातील बाळकडू त्यांचे वडिल श्री गोविंद राव पवार ह्यांचेकडून मिळाले. त्यांचे पिता गोविंदराव पवार हे "निरा कॅनॉल सहकारी सोसायटी चे बराच काळ सेक्रेटरी होते तर नंतर ते बारामतीला सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक झाले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील बारकावे, पळवाटा, सहकार क्षेत्रातील कायदेशीर बाबी ह्यांची जवळीक साधली असावी म्हणूनच शरद पवारांचे सहकार क्षेत्रातील कामगिरी अचाट, अफाट आहे.
ह्या लेखात शरद पवारांनी वेळोवेळी केलेला विश्वासघात, सत्ताबदल, त्यांचे सहकार क्षेत्रातील उत्तुंग भ्रष्टाचाराची शिखरे, ह्या विषयावर लिहिण्यात स्वारस्य नाही कारण ही सर्व प्रकरणे वाचक वर्गाला आताशा तोंडपाठ झाल्यागत आहे. सहकार क्षेत्रात तर शेवटी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी खुद्द अमित शहांना मैदानात उतरावे लागले. ह्यामध्ये सर्व काही आले.
पवार साहेबांचे जमिनीवर भारी प्रेम. केंद्रीय मंत्री असताना जावई सदानंद सुळे यांच्यावर बालेवाडी येथील रामोशी समाजाच्या आठ लाख ४९ हजार स्क्वेअर फूट भुखंडाच्या हेराफेरीचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रविन्द्र बर्हाटे ह्यांनी केला. २२ जणांविरुद्ध कारवाई झाली. पण बर्हाटे म्हणतात की पवारांच्या कुटुंबातील आणि अनेक बड्या असामींचे हितसंबंध असल्याने ह्या प्रकरणात कडक कारवाई झाली नाही.
लवासा घोटाळा हे प्रकरण न्यायालयात आहे तर शरद पवार सांगतात की "पत्राचाळ" प्रकरणात राऊतांना दिलासा देण्यासाठी मोदींच्या कानावर घातले, जेणेकरून राऊतांना दिलासा मिळावा. पण राऊतांना ईडी कडून दिलासा मिळाला नाही. आता संजय राऊत म्हणजे शरद पवारांचा घरगडी. (घरगडी - सांगितले तेवढे काम करणारा) आणि शरद पवार अशा घरगड्याबद्दल आपले वजन मोदींसमोर खर्च करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे घरगड्याला खुश करण्यासाठी जसे एखादवेळी खोटे बोलावे लागते तसे कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि संजय राऊत बद्दल काय बोलायचे? चार आण्याची प्यायची आणि रूपया रूपया पिल्यासारखे मिडियावर बरळायची. "अक्कल ठेवली गहाण अन् डोक्यावर ठेवली वहाण" अशा व्यक्तीला संजय राऊत म्हणतात. ज्याला राजकारणाची जाण नाही पण सत्तेची नशा आहे, पॉवर ची मस्ती आहे. सत्ता, नशा, पॉवर असली की जी परिपक्वता लागते ती नसणे त्याबदल्यात बदल्याची भावना घेऊन सत्तेचा दुरुपयोग, सत्तेची नालस्ती करणारा प्राणी म्हणजे संजय राऊत. आता सगळं गेल्यावर राउताची थंड ज्ञानपाजू देहबोली पाहा आणि पुर्वीचा गर्र गर्र डोळे फिरवून मस्तीतला रावत्या पहा. आताशा रडक्या राउताला वृत्तवाहिन्यांवर पहाताना मजा यायला लागली आहे. तर राउताच्या भाषेत "कालाय तस्मै नमः" मात्र एक गोष्ट खरी! दैव देते नी कर्म नेते म्हणजे संजय राऊत. एवढा मोठा मोदी - शहा शी पंगा घेतला. तर शरद पवारांच्या सहकार्याने २५ वर्षे सत्तेची बेगमी करता आली असती पण रोज रोज राउत सकाळी नऊ वाजता प्रातर्विधी पत्रकार परिषद घ्यायला लागले. नसत्या विषयावर नको तिथे खाजवायला लागले. आणि दैवानी दिलेले कर्माने नेले. धनुष्यबाण गेले, शिवसेना नाव गेली, मशालीची शाल उसवली आणि हातात घंटानाद आला. अशी अवस्था असणारा सम-पादक म्हणजे संजय राऊत.
शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० आणि १९५६ साली अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी "गोवा मुक्ती सत्याग्रहाला" पाठिंबा दर्शविण्यासाठी मेळावा आयोजित केला. विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम पाहात असताना त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांना आमंत्रित केले होते. शरद पवारांच्या भाषणावर मोहित यशवंतरावांनी पवारांना "युवक कॉंग्रेस" येण्याचा सल्ला दिला. १९६६ साली पवारांना युनेस्को ची शिष्यवृत्ती मिळाली तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आदर्श.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघे ही मित्र. १९६६ चे दरम्यान दोघे ही आपापल्या परीने स्वतः ला स्थापित करण्यासाठी संघर्ष करीत होते. बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी "शिवसेना" स्थापन केली तर शरद पवार १९६७ शरद पवार बारामती मधून कॉंग्रेस पक्षातर्फे प्रथमच विधानसभेत पोहोचले. दोघे ही राजकारणात खुप वरपर्यंत पोचलेत. त्यांच्यातील मित्रता कायम होती पण हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आणि नेता म्हणून शरद पवार ह्यांच्या मध्ये एक लकिर होती कायमची. बाळासाहेब मंचावरून त्यांना बारामती चा ममद्या, मैद्याचं पोत वगैरे बरेच काही शब्द वापरत असंत. पण शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री गहरी होती. शरद पवारांचा ड्रायव्हर म्हणतो की साहेबांनी गाडी दारुच्या दुकानाकडे घे असे म्हटले की समजायचे की आपल्याला आता बाळासाहेब ठाकरे ह्यांचे कडे जायचे आहे. शरद पवार मग बाळासाहेबांसाठी बियर चा क्रेट घेत असत आणि बाळासाहेबांकडे मग गप्पा रंगत असत. सुप्रिया सुळे ला बाळासाहेब आपली मुलगी ह्या नात्याने वागणूक देत असे. केवळ बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे भाजपा नी आपले हात बांधले आणि सुप्रिया सुळे ह्यांचे राजकारणात आगमन झाले. तरी पण मंचावरून बाळासाहेब म्हणायचे की शरद पवार विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही. बाळासाहेबांना जी दृष्टी होती ती ऊद्धवकडे नव्हती. आणि आज तुम्ही बघताय की राजकारणासाठी ते रक्तात असणे आवश्यक आहे. फोटोग्राफर आणि पत्रकारांचे रक्त वेगळे असते आणि राजकारण्यांची विचार पद्धती वेगळी असते. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मविआ युतीला पाठिंबा कधीही दिला नसता, असे राहुन राहुन वाटते. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा शरद पवारांबद्दलचा शब्द न् शब्द खरा ठरला आहे. शिवसेना आजच्या घटकेला ऊद्धवच्या हातून सटकली आहे.
तीन दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार ह्यांचा राजकारणातील वकुब इतका वाढला की १९९१ निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान राजीव गांधी ह्यांची हत्या झाली नी पंतप्रधान पदासाठी नरसिंह राव, नारायण दत्त तिवारी ह्यांचे सोबत शरद पवारांचे नाव सुद्धा चर्चेत आले.
६ मार्च १९९३ साली पुन्हा एकदा शरद पवार मुख्यमंत्री झाले नी १२ मार्च बॉंबस्फोट मालिकेत मुंबई हादरली. शेकडो गैरमुस्लीम मुंबई कर मारले गेले. तर त्यावेळी शरद पवारांनी सर्व बॉंबस्फोट हिंदू बहुल भागात झाले असताना सुद्धा वृत्तांमध्ये भ्रमित केले की एक बॉंबस्फोट मुस्लिम बहुल भागात देखील झाला. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मभर मुसलमानांशी जीवावर उदार होऊन हिंदवी स्वराज्य राखले. स्वातंत्र्यानंतर त्याची फळे चाखणारी मंडळी हा मराठा मावळा वर्ग केवळ स्वार्थासाठी आणि मतांसाठी लाचार होतात. आणि मुस्लिम जनांना झुकता कौल देतात. तो मुसलमान वर्ग जो भारताला "मुस्लिम राष्ट्र" घोषित करण्यासाठी १६०० वर्षांपासून अविरत प्रयत्नशील आहे. अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आठवतात. ते म्हणतात की भारताला आणि भारतातील हिंदू ना खरा धोका आमच्या हिंदू जनांकडून आहे. मी मुसलमान, ख्रिश्चन ह्या धर्मियांना घाबरत नाही तर आपल्यातील ह्या हिंदू लोकांकडून हिंदू समाजाला धोका आहे.
जो राजकारणी पैशाच्या जोरावर आपला पक्ष चालवतो अशा पक्षाला मुंगळे देखील पैसा कमाविण्यासाठी चिटकले असतात. अन्यथा शरद पवारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य पद्धतीवर अतिशय आश्चर्य वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पगार पाणी नाही. पण देशप्रेमाने ओतप्रोत इंजिनिअर झालेले, पीएचडी झालेले, सामान्य जन सर्व स्वतः ला हिंदू म्हणवितात आणि देशकार्यासाठी देह झोकून देतात. तर कुमार विश्वास म्हणतात की आजच्या घडीला देशात काय व्हायला हवे? ह्याची रुपरेखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाशी ५० वर्षे अगोदर पासून आहे. तर एक ब्रिटिश पत्रकार तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन जींची मुलाखत घ्यायला आला होता. मुलाखतीमध्ये त्याला सरसंघचालकांना चांगले तासायचे होते. मुलाखत सुरू करणार तो जेवणाची घंटी वाजली नी सुदर्शनजींनी म्हटले आपल्याला जेवायला जावे लागेल. दोघे ही जण जेवायला पंगतीत बसले. बीबीसी पत्रकाराने विचारले की तुमच्या बाजूला जेवायला बसलेल्या माणसाचे Designation काय आहे? तर सुदर्शन जी म्हणाले की तो माझा सारथी - कारचालक थोडक्यात Driver आहे. हे बघितल्यावर त्या पत्रकाराचे मन पालटले आणि संघाला धारेवर धरायला मुलाखत घेणाऱ्या त्या पत्रकाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुलाखत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. आज जगभऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव आहे २७ सप्टेंबर १९२५ , नागपूर स्थापन झालेल्या संघटनेला जगातील सर्वात मोठी संघटना अशी मान्यता आहे. तर राष्ट्राला निस्वार्थ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अगणित कार्यकर्ते दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना १० जून १९९९ रोजी म्हणजे २३ वर्षांपूर्वी. पण २३ वर्षात हा पक्ष महाराष्ट्राबाहेर गेला नाही. निस्वार्थ सेवा भावाचा लवलेशही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका ही कार्यकर्त्यांमध्ये नाही. सर्व खेळ पैशावर खेळणारा हा स्वार्थी पक्ष आहे असे म्हणायला हरकत नाही. चला, पक्षातील एकही जण निस्वार्थ नाही. पण प्रसंगी हिंदू धर्माला सुद्धा पायदळी तुडवणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे शरद पवार म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जी क्षमता आहे, जसे निष्काम,समर्पित, जाज्वल्य राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत कार्यकर्ते आहेत. तसे जगातील इतर कोणत्याही संघटनांमध्ये नाहीत.
पांढरा सदरा आहे म्हणून त्यावर भ्रष्टाचाराचे डाग लागले नाहीत का शरद पवारांवर ? निश्चित पणे लागले असते. पण सरकार साबित करण्यात असमर्थ ठरले असावे किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. मात्र २०२० साली अधिकारीक रित्या त्यांची घोषित संपत्ती डोळे फिरविणारी आहे. आणि त्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखान्यांचा उल्लेख आढळत नाही. त्यांचेवर ११०० कोटी रुपये #Demonitization चा संदर्भ उल्लेख कुठेही आला नाही. तर कोर्टाने त्यांच्यावर एफआयआर करायला सांगितला होता. केला की नाही? माहिती नाही. कदाचित कोणाची माय व्यायली नसेल अजून म्हणून झाला नसेल. तर अशा संपत्ती व्यतिरिक्त त्यांची घोषित संपत्ती खालीलप्रमाणे -
एकूण चल अचल संपत्ती - ३२,७३,६७,२६९ रूपये
चल संपत्ति -२५,२१,३३,३२० रुपये
अचल संपत्ती -७,५२,३३,९४१ रुपये
नामांकनाचे वेळी रोकड - ६५,६८० रुपये
परिवारातील अन्य सदस्यांचे खात्यात रोकड - ९,३९,९३,३८६ रूपये
शेयर्स, डिबेंचर्स, बॉंड्स - ७,४६,२४,४४९ रुपये गुंतवणूक
अग्रिम राशी व इतरेजनांना दिलेले कर्ज -७,४५,८४,००० रुपये
दागदागिने ८८,७५,८०५ रुपये
शेतभुमी -१,३०,९७,९६० रुपये
गैर शेत भुमी - ९१,७१,४८० रुपये
आवासिय बिल्डिंग - २,१७,१४,५०१ रुपये
कमर्शियल बिल्डिंग - ३,१२,५०,००० रुपये
एकूण देणे - एक करोड रुपये
तर मोदींची संपत्ती - सतत २२ वर्षे मुख्यमंत्री पद व पंतप्रधान पदी विराजमान -
बॅंक अकाउंट मध्ये - २.२३ कोटी
कोणताही भूखंड नाही. अचल संपत्ती नाही.
गांधीनगरमधील त्यांची जमीन दान केली आहे. (रिअल इस्टेट सर्व्हे नंबर ४०१/ए)
एकंदर व्यक्ती म्हणून आणि संघटना म्हणून त्यांची तुलना मोदीशी होवू शकत नाही. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पण होवू शकत नाही. दोहोच्या तुलनेत शरद पवार मोदी व संघाच्या आसपास पण फिरकत नाहीत. मोदींच्या सुरुवातीच्या काळात मदत केली होती तेवढेच काय ते मोदी शरद पवारांचे नाव घेतात. तर सभेत सांगताना मोदी सांगतात की "भ्रष्टाचार चव्हाट्यावर येवू नये म्हणून काही लोक माझ्याविरुद्ध षडयंत्र करीत आहेत" हा टोला त्यांनी शरद पवारांना, पवारांचे नाव न घेता लगावला आहे.
शरद पवारांवर श्री गोपीनाथ मुंडे ह्यांनी आरोप केला होता की त्यांचे दावूद इब्राहिम शी सलोख्याचे संबंध आहेत. एवढेच् नव्हे तर १९९३ बॉंबस्फोट मालिकेत त्यांनी दावूद ला भारतातून पळून जाण्यात मदत केली. भारत असा एकमेव देश आहे जिथे देशाअगोदर स्वार्थ जोपासला जातो आणि म्हणूनच आमची नेते मंडळी दावूद इब्राहिम कडून आर्थिक लाभ होत आहे म्हटल्यावर देशहिताला दुय्यम स्थान देणारी ही मंडळी आहे. बॉलिवूड चे कितीतरी अभिनेत्री अभिनेता दावूद हातातील कळसुत्री बाहुल्या आहेत. आणि दावूद च्या कार्यक्रमातील त्यांचे नाचगाण्याचे फोटो आवडीने बघितले जातात. मुद्दा असा आहे की अशा अभिनेत्यांना किंवा अभिनेत्री ना सरकार ने दावूद बद्दल माहिती का विचारत नाही? किंवा बॉलिवूड मंडळी दुबई ला जाताना सरकारला का सांगत नाही की आम्हाला दावूद चे बोलावणे आले आहे. कृपया लक्ष असू द्यावे. त्यानंतर सरकार जी पावले उचलायची ती उचलतील पण बॉलिवूड मंडळी आपल्या देशहिताच्या कर्तव्याला मुकतात ही बाब महत्वाची आहे.मुर्ख जनता अशा मंडळींचे चलचित्रपट बघुन, भारताविरुद्ध संगठन चालविणाऱ्या दहशतवाद्यांना अप्रत्यक्षरीत्या पैसा पुरवितात. असे म्हणायला हरकत नाही.
तर आजपर्यंत असे हे अपराजित शरद पवार ह्यांनी शिवसेना, कॉंग्रेस ला एकत्र आणून जबरदस्त खेळी केली आणि आमचे पहलवान तेल लावून तयार आहेत असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस ह्यांना चारोखाने चित केले. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, जाणता राजा, शरद पवारांना समजायला शंभर जन्म अपुरे पडतील! काय काय आभुषणे शरद पवारांच्या कर्तृत्वाला लावली गेलीत. शरद पवारांचे राजकारण अमित शहांना सुद्धा कळत नाही वगैरे वगैरे म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे. संजय राऊत स्तुती करायला बसले की…. त्यांची उद्धव ची मुलाखत आठवते ना! 😂😂😂 WHO सारखी संघटना ऊद्धवाकडून वैद्यकीय ज्ञान घेते 😂😂😂 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या भाषेत "आयला चाटायची म्हणजे किती चाटायची!" तर असला हा चोंबडा राऊत. तर घर कोंबडा त्याचा मालक. आता खुर्ची गेल्यावर बाहेर फिरायला लागला बरे का! राऊतांची स्तुती म्हणजे पार उतु मातु जाती. आपले सरकार - आपली मिडिया - वाटेल ते बोला - दाम आहे मोजला. त्यावर पैसा घेऊन वृत्तवाहिन्यांवर मविआ आघाडीच्या पदरात दान टाकणारा पत्रकारितेचा चौथा दंभ. मग काय शरद पवारांच्या स्तुतीला शब्द कमी पडले हो! पण शरद पवारांचे कर्तृत्व देखील मानावे लागेल. की ज्या पक्षासोबत भाजपा लढली. त्या पक्षाला च् पळवून नेले आणि स्वतः मविआ सरकार बनविले. इतके जबरदस्त राजकारण की अमित शहांनी चिडून म्हणावे की "हमारा तो अस्तबल ही चुराकर ले गए!" जबरदस्त खेळी. मान गए पवार साहब! अमिताभ बच्चन शोले च्या भाषेत सांगायचे तर "पर एक गलती कर दी पवार साहाब, तुमने ऊद्धव को मुख्यमंत्री बनाया"! ज्याला माजी राज्यपाल कोश्यारी " राजकारणातील साधु"संबोधतात. ज्याला राजकारणाची जाण नाही असा पक्षप्रमुख निवडला, मुख्यमंत्री पदासाठी आणि ह्या मर्द मराठा मावळा - जाणत्या राजाचा मावळतीचा प्रवास सुरू झाला.
ऊद्धव ठाकरे खरोखर साधु माणूस, राजकारण कशाशी खातात हे माहित नसणारा फोटोग्राफर. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज राजकारणी लोकांच्या पंगतीत ढकलल्या गेले. त्यांचा मध्यस्थ संजय राऊत. खरे म्हणजे सत्ता, पॉवर,पैसा पचवायला परिपक्वता लागते ती ह्या दोघांकडेही नव्हती. राज्य आले, सत्ता आली ह्याचा अर्थ असा होत नसतो की मनमानी वागा आणि जनतेच्या पैशाची लयलूट करा. मिडियाला वेठिस धरून वैयक्तिक प्रहार करा. मविआ सरकार अस्तित्वात आले आणि एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर पातळी सोडून प्रहार करण्यात आले. ही सर्वात वाईट देणगी मविआ सरकारने महाराष्ट्र राज्याला दिली. ह्या आधीचे महाराष्ट्र सरकारचे राजकारण बघा, त्यांचे एकमेकांवरील केलेल्या कोट्या बघा! महाराष्ट्राचे आपली स्वतःची मान्यता, प्रगल्भता, परिपक्वता असणारे राजकारण होते, असे राजकारण एकदम घसरले. ते इतके की शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणाले की "संजय राऊत हा बिनडोक माणूस आहे. ते काहीही बोलू शकतात" ह्या थराला जाऊन देवेंद्र फडणवीस कधी बोलले नव्हते पण जेव्हा अस्तित्व टिकवायला राऊत दोषारोपण करायला, मला मारण्याची सुपारी दिली वगैरे बोलायला लागतात तेव्हा अशी विधाने साहजिकच् उपमुख्यमंत्र्यांचे तोंडून निघत असावीत. तर काही शिवसैनिक म्हणतात की शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊत ने घेतली.
"अकेला देवेंद्र क्या क्या करेगा?" असे सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या. थोडेसे विश्लेषण करा ह्या सुप्रिया ताईंच्या वाक्यांचे! देवेंद्र चा धसका घेतलाय पण तो असा एकच् आहे!तर असा एकटा असणारा देवेंद्र काय काय करणार? सुप्रिया ताई असा एकटा देवेंद्र फडणवीस आता शरद पवारांचा मावळतीचा प्रवास सुरू करणार.
आजच्या घडीला देवेंद्र ने घरकोंबडा उद्धवला घराबाहेर काढुन वणवण फिरायला भाग पाडले. खरे म्हणजे ज्यावेळेस ऊद्धव ठाकरे मातोश्री तून बाहेर पडले नी सिल्व्हर ओक वर माथा टेकला, त्याचवेळी ऊद्धव उद्धवस्त झाला आणि त्याच्या नशिबी वणवण फिरणे आले. काय तो रुबाब होता मातोश्री चा. कधीतरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाहेर पडले मातोश्री च्या? कधीच नाही. एवढे मोठे लालकृष्ण अडवाणी. ते पण बाळासाहेबांची भेट घ्यायची तर मातोश्रीवर. आणि तो चोंबडा राऊत चॅव चॅव करीत उसने अवसान आणून डोक्यावर पडलाय तर आदित्य गद्दार गद्दार म्हणून तीन बोटे आपल्याकडे दाखवून आपल्या बापाला शिव्या घालतोय.
रौब गया रुतबा गया और गया रुबाब!
कौन जाने कब मिलेगा सत्ता का कबाब!
अशी अवस्था देवेंद्र जींनी उद्धव ची करून ठेवली. उद्धव नी पण शब्द पाळला. त्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद हवे होते. ऊद्धव पायउतार झाले नाही तर देवेंद्र जी ने त्यांना पायउतार केले. राजकारण न समजणारा साधु म्हणजे ऊद्धव. शरद पवारांनी त्याला बजावले होते, कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नकोस. पण ऊद्धव ने राजीनामा दिला आणि न्यायालयीन प्रक्रियेत अंगलट आला.
सत्तेवर येऊन फडणवीसांनी मविआ सरकारवर जी कुरघोडी केली ती शब्दातीत आहे, अनाकलनीय आहे. राऊत्या बोमलतोय २००० कोटी चुनाव चिन्ह, शिवसेना पक्षाचे नाव सौदा वगैर खरोखर कपडे उतरवले शेवटची अंडरपॅंट अंगावर आहे पण पठ्ठ्याचा जिगरा जबरदस्त आहे. एकतर हा अजून सुद्धा सत्तेच्या धुंदीतून बाहेर नाही आला किंवा हा खरोखरच बिनडोक आहे. एकतर खरोखर सुपारी घेऊन ह्याने ऊद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ केला किंवा काकांनी ह्याला अडकवला आणि ह्याचा पर्यायाने ठाकरे गटाचा पोपट केला. दोन्ही परिस्थितीत पाहिले - तर राजकारण उद्धव - राऊत दोघांनाही कळले नाही. सहज मिळाले म्हणून कदर नाही असे झाले.
कोणाला कसे नी कुठे ठेचायचे ते शिकायचे तर फडणवीसांकडून - आता निवडणुका समोर आहेत. अशावेळी फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी - हा विषय काढला नी राष्ट्रवादी च्या दोन्ही पवारांचा धुरळा उडवून दिला. शरद पवारांना उत्तर द्यायला बाध्य केले. पण हे उत्तर अर्धवट आहे असे सांगत फडणवीसांनी चेंडू परत शरद पवारांकडे टोलावला. तर अजित पवार तर अजाबात (अजिबात) उत्तर देवू शकत नाही. कशाला तो अडीच वर्षे जुना विषय! कशाला तो अडीच वर्षे जुना विषय ! अशी बडबड करीत ह्या विषयावर अळीमिळी गुपचिळी गप्प बसताहेत. मात्र फडणवीस अर्धवट दोन वाक्य जनतेसमोर टाकुन एक बाब सांगण्यात यशस्वी झाले आहेत की ज्या प्रमाणे कॉंग्रेस व शिवसेना शी वाटाघाटी शरद पवारांच्या सुरू होत्या तसल्याच समानांतर वाटाघाटी शरद पवार भाजपा शी करीत होते. हे ऐकून कॉंग्रेस व शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. फडणवीस पुढे म्हणतात ह्या वाटाघाटी भसकल्या त्या "फडणवीस मुख्यमंत्री नको" ह्या मुद्द्यावरून. परत पुढे फडणवीस म्हणताहेत की राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी कोणी सांगितले? त्यांचे बोट परत शरद पवारांकडे आहे. म्हणजे कोणा कोणाला कसे कसे कुठे कुठे कसल्याप्रतीने वापरायचे ह्यामध्ये ज्ञानी शरद पवारांना ५० वर्षाच्या राजकारणात पहिला शेरास सव्वा शेर भेटला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस.
आता सत्तेमध्ये विरोधी बाकांवर अजित पवार बसल्यानंतर सत्ताधारी पक्षांना त्रास कसा द्यायचा? हे शरद पवार पुरते जाणून आहेत. पुर्वी देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना "मराठा आरक्षण" मास्टर स्ट्रोक शरद पवार खेळले होते. गंमत म्हणजे त्या मास्टर स्ट्रोक वर षटकार मारत फडणवीसांनी मराठा आरक्षण झोळीत घातले होते. आता वृत्तवाहिन्यांवर तर शरद पवार हे देवता तुल्य कारण कित्येक वृत्तवाहिन्यांचे पोट शरद पवार भरतात! अशा प्रकारे पत्रकार वागताना दिसतात. आता खरे खोटे त्यांचे ते जाणे! आता तर मविआ च्या कानशिलात फडणवीस शिंदे नी शिलगावली आणि सत्तेची खुर्ची बुडाखालून खेचून काढली. मग सत्ताधारी पक्षाची ऐसीतैसी करायची तर कशी? मराठा आरक्षण हा मुद्दा काढु शकत नाही कारण शरद काका सत्तेत असताना ज्या पद्धतीने हा मुद्दा हाताळला! मविआ ने आता हा मुद्दा उपस्थित करावा अशी लायकीच् उरली नाही. आणि जर हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला तर अकेला फडणवीस ची इतकी धास्ती की जर फडणविसांनी खरोखर कायद्यांतर्गत पळवाट शोधून "मराठा आरक्षण" दिले तर नाकावर टिच्चून नाचक्की नको म्हणून कॉंग्रेस काळातील बंद केलेले "जुने पेंशन" प्रकरण उकरून काढले. शेतकरी मोर्चा प्रकरण उकरून काढले. सोबतीला दिवस रात्र बोंबलणारी मिडिया हाताशी धरली आणि स्थिर सरकार अस्थिर करण्याची मोहिम सुरू केली.
"आता एकच मिशन - जुनी पेन्शन" - महाराष्ट्रातील १८ लाख कर्मचारी संपावर. आता ही मंडळी संपावर गेली खरी. शरद पवार आणि कंपूला वाटले की झाले काम फत्ते. पण ह्यांना काय माहिती की गाठ फडणवीसांशी आहे. सरकारने "मेस्मा" जारी केला. असल्या संपाचा उत्साह चार दिवसांचा असतो. कारण शरद पवारांचे खानदान चालविण्यापेक्षा कर्मचारी स्वतः चे घर चालविणे उचित समजतो. चार दिवस बोंबाबोंब केली नी पाचव्या दिवशी ७५% कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाल्याचे वृत्त आहे. पण ह्यामुळे सरकारला जाग आली. सरकारने स्वतः कर्मचारी भरती न करता आता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कारण असे म्हणतात की सरकारी खजान्यातील ७०% पैसा फक्त पेन्शन देण्यासाठी खर्ची होतो. तर जुनी पेन्शन योजना लागू केल्यास ८०% पैसा खर्च होणार. म्हणजे जाणूनबुजून सरकारला गोत्यात आणण्याचे काम मविआ सरकार करताना दिसत आहेत.
बरे! मागील अडीच वर्षात मविआ सरकार असताना जुनी पेन्शन योजना का लागू केली नाही? तर अजित पवार म्हणतात तेवढा पैसा सरकारकडे नाही. म्हणजे काहीही करण्यासारखे नाही तर "खुट्या गाडा" असलाच् प्रकार.
७५% कर्मचारी परत कामावर रुजू झाले म्हटल्यावर "जुनी पेन्शन" फुसका बार ठरला म्हणण्यास हरकत नसावी.
बरे! शरद पवार सत्ताधारी पक्षाला घेरायचे असेल तर एकाच् मुद्द्यावर घेरत नाहीत तर त्यांनी म्हणजे मविआ किंवा शेतकरी वर्गानी लॉंग मार्च मुंबई च्या दिशेने काढला. खरा शेतकरी शेती सोडून कुठेही जात नाही. खरा शेतकरी शेतात उगवलेली फसल - भाव नाही म्हणून कधीही फेकत नाही. फक्त मिडिया समोर नाटक करण्यापुरते जगाला फसविण्यासाठी फॅब्रिकेटेड वृत्त द्यायचे असले की तात्पुरते पीक फेकण्यास तयार होतो.
मागे असेच दुधाचा टॅंकर रस्त्यावर फेकतानाचे वृत्त होते. नंतर सांगण्यात आले की चुन्याची निवळी दुधाच्या टॅंकर मध्ये भरली आणि मिडिया समोर रस्त्यावर फेकली. चुन्याची निशाणी रस्त्यावर उमटली आणि खरा प्रकार उघडकीस आला.
त्याचप्रमाणे मिडिया आता शेतकरी मोर्चा शेतकरी मोर्चा - लांडगा आला रे आला! सारखी भिती दाखवित होते तर फडणवीस शिंदे जोडगोळी ने योग्य निर्णय घेतला आणि मोर्चा वाशिंदजवळ गोठवला.
एक बातमी अतिशय गाजली एका शेतकऱ्याची तब्येत खराब झाली. आणि त्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता ही जबाबदारी कोणाची? ज्यांनी मोर्चा आयोजित केला. त्यांची जबाबदारी असायला हवी. असे निक्षून सांगावेसे वाटते.
मविआ चे कर्ताधर्ता जे काही गेम खेळताहेत ते सर्व त्यांच्या अंगलट आणण्याचे कसब फडणवीस शिंदे सरकार मध्ये आहे. जुने बिनडोक कॉंग्रेस सरकार नाही की शरद पवारांना शरण जाईल किंवा शरद पवारांच्या चाली समजणार नाही.निस्वार्थ बुद्धी ने जेव्हा जनतेची सेवा करण्याचा वसा घेतला असेल तर विरोधी पक्ष रस्त्यात किती ही काटेरोपण करो, देव निस्वार्थ सेवाभावी लोकांना दैवी उपाय नकळत सुचवतो आणि काट्यांचे निर्दालन करतो. मविआ कर्ताधर्त्याचे दोन्ही काटे उखडून फेकण्यात फडणवीस शिंदे सफल झाले आहेत.
तिकडे उद्धव ठाकरे - शिष्य कसा नसावा! ह्याचे ज्वलंत उदाहरण. शरद पवारांनी निक्षून सांगितले होते की कुठल्याही परिस्थितीत "राजीनामा" देवू नको. पण उद्धव ठाकरे ने राजीनामा दिला आणि परत एकदा आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली.
एकंदर काय सगळीकडून गोची होत आहे. शेरास सव्वाशेर शरद पवारांना पन्नास वर्षांत पहिल्यांदाच मिळाला. उगि नादी लागण्यापेक्षा शरद साहेब आता ८० पार झालेत, राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये खुप सारे पवार आहेत,अर्थात शरद पवारांच्या तोडीचा कोणी नाही. आता ह्या वयात नव्या जोमाने राज्य करणाऱ्या शिंदे फडणवीसांना प्रत्त्युत्तर देणे जरा जड जातेय, देवेंद्र च्या खेळी पुढे राकॉं च्या खेळी निस्तेज होताहेत. वय झालंय! सत्ता गेली आहे. परत परत फिरुन निवडणूका, भ्रष्टाचार झाकण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या, मोदी आला तर नाव जाणार!त्यात निस्तेज होत जाणारी जाणता राजाची प्रत्येक खेळी, मावळती कडे झुकणारा देह! शरद पवार साहेब आता भार सुपुर्द करा नी निवृत्ती घ्या! पोरांना चालवू द्या पक्ष आता ! सगळी जनता पण हेच् म्हणते आहे की "अकेला शरद पवार क्या क्या करेगा!" तुमचा विश्वासघाताचा, भ्रष्टाचाराचा, हिंदू विरोधी वारसा असणारा तुमचा पक्ष पुढली पिढी चालवायला कदाचित समर्थ असेल. एकदा त्यांना संधी तर द्या.
©️भाई देवघरे
Follow me on @sadetod
Write to me sadetod08@gmail.com
मी मर्द मराठा मावळा! - मी मावळता राजा!
मी मर्द मराठा मावळा! - मी मावळता राजा!
मी मर्द मराठा मावळा! - मी मावळता राजा!
मी मर्द मराठा मावळा! - मी मावळता राजा!

0 

Share


भाई देवघरे
Written by
भाई देवघरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad