आज मी माझीच वास्तव कथा मांडणार आहे, खरं तर हे जगासमोर मांडण्याची माझी इच्छा ही नव्हती आणि धाडस तर त्याहून नव्हतं,पण माझे गुरू,माझे आधार आणि माझ्यासारख्या कित्येक अबला स्त्रियांचे बंधु माझे पालक पिता (त्यांचं नाव लिहायला आणि सगळ्यांना सांगायला खूप आवडलं असतं मला पण त्यांनी नकार दिला म्हणून मी त्यांचे नाव नाही लिहू शकतं)यांनीच मला हे मांडण्याचे धाडस दिले, प्रथमतः मी त्यांचे आभार मानते...
मी दोन वर्षापूर्वी हेमंत नावाच्या माझ्या प्रियकरासोबत घर सोडून पळून आले,आम्ही दोन वर्षापूर्वी घरच्यांची लग्नासाठी संमती मागितली होती,तेंव्हा माझ्या घरच्यांनी आमच्या लग्नाला तीव्र विरोध केला, कारण त्यांच्या मते माझी निवड चुकली होती,हेमंत कसा वाईट आहे याचा पाडाच माझ्या भावाने माझ्यासमोर वाचला होता,तेंव्हा हेमंत वर होणाऱ्या आरोपांनी माझा राग अनावर झाला आणि मी घरच्यांचे काहीही न ऐकता त्यांना नको नको ते बोलले आणि घरच्यांना कधीही परत न भेटण्याच्या इराद्याने घरातून बाहेर पडले,घरच्यांनी मला थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण माझ्याच घरच्यांना जीव देण्याची आणि कायद्याची धमकी देऊन घरातून निघून आले,पुढे मी हेमंत शी लग्न केले आणि नवीन संसाराला सुरुवात केली,पाहिले दोन तीन महिने आनंदात गेले,पुढे हेमंत ने कामधंदा सोडून दिला,आणि तो दारूच्या व्यसनात रमला,घरात,त्याच संसारातील लक्ष उडाले होते आणि वाईट मित्रांच्या संगतीत राहून हेमंत वाईट मार्गाला लागला,आता हेमंत ची घरची मंडळी यासाठी मलाच जबाबदार धरत होती,एकीकडून हेमंत ची मारहाण तर दुसरीकडून घरच्या मंडळीचा त्रास लग्न करताना चा हेमंत आणि आजचा हेमंत यात खूप मोठी तफावत होती,आता रोज मारहाण शिवीगाळ असायची,घरातून पळून आल्यामुळे घरी जाऊ शकत नव्हते,आपलीच चूक आहे असं समजून पडेल ते कष्ट करून जगत होते,आज सगळं ठीक होईल,उद्या ठीक होईल या आशेवर दिवस काढत होती,पण परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत चालली होती...
एके दिवशी हेमंत माझ्या जवळ आला आणि खूप रडला त्याला त्याच्या वागण्याचा खुप ञास होत होता,आता मी सुधारेल असा त्याने मला विश्वास दिला,मला हेमंत मध्ये झालेला हा बदल पाहून जगण्याची हिम्मत निर्माण झाली,हेमंत ने पुण्यात नोकरी शोधली होती,आणि आम्ही दोघेही पुण्याला कामासाठी आलो,हेमंत ने एक रूम पहिली होती,तशी रूम शहरापासून लांब होती,पण आमच्याकडे पर्याय नव्हता,संसाराला नव्याने सुरुवात करायची या एका आशेवर पडेल त्या संकटाला तोंड देण्याचा निर्धार केला होता,आम्ही आमचं घर सामान रूम मध्ये टाकलं आणि हेमंत मालकाला भेटायला म्हणून बाहेर पडला मी घरसामान नीट नेटकं लावून घेतलं,आणि स्वयंपाक ला लागले,रात्रीचे 9 वाजले होते पण हेमंत अजून घरी आला नव्हता,मला एकटीला आता भीती वाटू लागली होती,रात्रीच्या 10 वाजता 4 गडीमानस आमच्या घरी आली आणि....
त्या रात्री माझ्यावर जो प्रसंग ओढावला त्याने माझ्या आयुष्याची राखरांगोळी झाली,ही चारही मंडळी हेमंतचे मित्र होते आणि हेमंतला पैसे देऊन त्यांनी माझा सौदा केला होता,हे चारही नराधम माझ्या शरीराशी खेळण्यासाठी आले होते,त्या रात्री माझ्यावर जो अतिप्रसंग झाला त्याने मी पुरती खचून गेले होते पहाटे 4 वाजता त्या नराधमांना झोप लागली आणि मी तिकडून पळ काढला अंगातला त्रान नाहीसा झाला होता,कशीबशी मी तिकडून निसटले,आई वडिलांचे शब्द कानात घुमत होते भावाची काळजी डोळ्यासमोर तरळत होती,आपल्या माणसांना कायद्याची भीती दाखवून जीव देण्याची भीती एका तिराहित माणसासाठी सोडून आल्याचा पचतावा होत होता आता जगण्याची इच्छा राहिली नव्हती,जीव द्यायचा विचार करून एका गाडीला आडवी गेले,त्यांनी गाडीला ब्रेक लाऊन गाडी थांबवली,त्या गाडीतून दोन महिला आणि एक पुरुष उतरला,मी त्यांच्या समोर मोठ्याने हंबरडा फोडला,त्यांनी मला शांत केलं आणि त्यांच्या आश्रमात आणलं...
तिथेच माझ्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली,तिथे अनोळखी पण जिवाभावाची माणसं भेटली,जिथे माझ्यासारख्याच हरलेल्या स्त्रिया होत्या पण आयुष्य नवीन उम्मेदिने जगायचा प्रयत्न करत होत्या,आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते महिला आश्रमातील सगळ्या दुःखी महिलांचे गुरुबंधू ज्यांच्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत,समाजाने नाकरल्यावर ज्या देवाने आम्हा स्त्रियांना आधार दिला त्या माझ्या दादाला आम्हा सर्व बहिणींचे आयुष्य लाभो,जिच्या प्रेरणेतून हे आश्रम उभा राहिल त्या ताई ला आमचे आयुष्य लाभो,जिथे रक्त उभा नाही राहिलं,जिथे प्रेमाने साथ सोडली तिथे माणसात ला देव उभा राहिला...
माझ्या लाडक्या भगनिनो मी आणि माझ्यासारख्या सर्व पीडित महिलांकडून तुम्हाला एकच विनंती आपल्याला दाखवला जात ते सगळंच खरं नसतं,आई वडील आणि भाऊ बहिण यांना दोन दिवसात भेटलेल्या माणसांसाठी सोडून नका,ज्या आई वडिलांनी जिवापलिकडे तुम्हाला जपलं आहे त्यांनाच तुमचं चांगला काय आणि वाईट काय कळतं आततायीपणा करून नको ते निर्णय घेऊ नका कधी कधी आपली वाटणारच घात करुन जातील जपून रहा स्त्री ची अवस्था आजही विचित्र आहे सुरक्षित रहा...काळजी घ्या...
मला हे लिहिण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली त्यांचे मनापासून आभार,माझ्या आयुष्यात ज्या मैत्रिणींनी मला त्यांच्यात सामावून घेतले त्या सर्व मैत्रिणींना ही खूप खूप धन्यवाद,आणि त्या ताई ला ही मनस्वी धन्यवाद जिच्या प्रेरणेने आम्हा महिलांना हक्काचं घर मिळालं...
धन्यवाद