Bluepad | Bluepad
Bluepad
कष्ट न करण्याची मनोवृत्ती बळावत चालली आहे हि गंभीर समस्या
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
17th Mar, 2023

Share

*कष्ट न करण्याची मनोवृत्ती बळावत चालली आहे हि गंभीर समस्या*
सहजासहजी या जगात काहीच मिळत नाही पण सध्या सगळीकडे सगळं काही सहज मिळविण्याची मनोवृत्ती बळावत चालली आहे.आयुष्य आणि भविष्य बदलण्याची ताकत फक्त कष्टात असते .खडतर संघर्ष दैदिप्यमान इच्छा शक्ती आणि अहोरात्र धडपडत मेहनत कष्ट करण्याची मानसिकता असलीतरच अशक्यप्राय गोष्ट सुद्धा शक्य होते .कष्ट मेहनत करण्याची मनोवृत्ती मानसिकता हि उत्तरोत्तर कमी होत चालली आहे.यश सगळ्यांना संपादन करायचं आहे .पण त्या साठी कष्ट मेहनत घेण्याची प्रबळ इच्छा शक्ती पाहिजे तितक्या प्रमाणात वाढयला पाहिजे ती न वाढता कमी होत चालली आहे. यश प्रगती ,हि प्रत्येकाला अपेक्षित आहे.यश नको आहे असं कोणीही शोधून सापडणार नाही.मग यश मिळण्यासाठी मेहनत कष्ट तर करावेच लागतील पण नेमकं हेच कष्ट बहुतांश लोकांना नको नको झालं आहे.तरुण पिढी तर या मध्ये अग्रेसर आहे.जीवनात कष्ट मेहनत हे फक्त प्रगतीसाठीच नाही तर मानसिक शारिरीक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. पण हेच गुणकारी लाभकारी कष्ट बहुतांश लोकांना नको आहे.सध्या सगळ्याच क्षेत्रात दिवसेंदिवस कष्ट करण्याची मानसिकता कमी होत चालली आहे हि सचित्र वस्तू स्थिती आहे .तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती यशोशिखरावर पोहोचली असुन रोज नवनवीन शोध लागत आहेत हे सगळं कौतुकास्पद अभिनंदनीय असलं तरी कष्ट करण्याची मानसिकता मनोवृत्ती हि दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हि भविष्यातील पिढी साठी धोक्याची घंटा आहे. आरामदायी वातानुकूलित जीवनशैली हि जरी रूढ होत चालली असली तरी हिच जीवनशैली व प्रत्येकाला नको असलेलं कष्ट मेहनत हिच भविष्यातील सगळ्यात मोठी चिंता समस्या आहे. जीवनात कष्ट मेहनत ला पर्याय नसतो . त्या शिवाय कोणीही यशोशिखरावर गाठु शकत नाही. मात्र हाच प्रगतीच मंत्र सगळ्यांना नकोसा झाला आहे. दिवसेंदिवस दिवस शरिर प्रकृती हि नैसर्गिक रित्या कमजोर होत चालली आहे. त्या मध्ये आपण सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.आपण शरीराला जास्तीत जास्त कमी कष्ट मेहनत कशी होईल यासाठी प्रयत्नशील आहेत.मग शरीर प्रकृती मजबूत कशी होईल. तसंच कष्ट न करण्याची मनोवृत्ती हि दिवसेंदिवस वाढत जाण सुद्धा स्वतःच्या विकासा सोबतच सामाजिक विकासासाठी घातक आहे. मुळात आपलं शरीर व्यवस्थित राहण्या बरोबरच जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपलं कष्ट मेहनत हेच आपल्याला लाभकारी असतं पण बहुतांश लोक कमीत कमी कष्टात पुढे जाण्यासाठी धडपडत आहेत हिच बाब‌ धोक्याची घंटा ठरतं आहे. आपल शरिर व्यवस्थित राहण्यासाठी शरिराला एक मर्यादे पर्यंत कार्य आवश्यक आहे.तितक कार्य नसेल तर मग झोप न लागणे,वजन वाढणे , अनेक आजारांना निमंत्रण विविध शारिरीक व्याधी अशा अनेक समस्या कारण नसताना देखील आपल्या मागे लागतात.महणजे कष्ट मेहनत न करण अथवा हि मनोवृत्ती बळावत जाण काल आज उद्या साठी सुद्धा घातक आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. जास्तीत जास्त आराम किती करता येईल याकडे जास्तीत जास्त लोकांचा कल दिसून येतो.हिच आरामदायी मनोवृत्ती मानसिकता बळावत जाण हे हितकारक नसल्याने हि मानसिकता संपुष्टात आणली पाहिजे.आणि सदैव मेहनत कष्ट करण्याची मानसिकता तयारी मनोवृत्ती वाढली पाहिजे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad