तस तर वचन होत सात जन्माचं,
पण पुढचा जन्म देवा मला देऊच तू नको,
त्याच्या आयुष्यात माझी अर्धवट जागा देवा तू लिहुच नको..
त्याच्या असण्याने मी,मी असायचे,
त्याच्या डोळ्यात मला मी दिसायचे..
खुश व्हायचे मी जेव्हा त्याच्या हसण्याच कारण मी असायचे,
पण पुढच्या जन्मी देवा त्याला दुसर कोणीतरी भेटुदे,
माझ्याहून चांगल त्याच त्याला अस असुदे..
मला नको पुढचा जन्म ज्यात तो मला अर्धवट सोडेल,
सोपं नाही रे देवा मी पुन्हा एकदा मोडेल..
या जन्मात ना मी त्याला खुश नाही ठेवू शकले,
नकळत पणे मी त्याच्या प्रेमाला रे मुकले..
माझा तर जीव अजूनही त्याच्यातच आहे,
पण तरीही पुढचा जन्म देवा तू मला देऊच नकोस,
त्याच्या आयुष्यात माझी अर्धवट जागा देवा तू लिहुच नकोस...