गरीबीच लेकरू
शेतकर्याचं कोकरू
मजुराच बकरू
सामान्यांच वासरू
मोठमोठ्यांनी ओरडतया
आमचं घर आम्हीच मोडतया ॥1 ॥
पैशाच मागण
भविष्याचं जगणं
वर्तमानावर हगण
संघात्मक जगण
बेभान बडबडतया ॥ 2 ॥
आमच्या स्वार्थापोटी
भाराभर संघ गाठीभेठी
गाड्याची दाटारेटी
अस्तित्वाच्या स्वार्थापोटी
आंदोलनाचे टोप्या घालतया ॥3॥
ज्यांच्यामुळे मी उभा
मीडियात सभा
मूळ विसरत गाभा
दुरुन पाहते नभा
कर्तव्यच विसरतया ॥4॥
आंदोलन करतयं
नळ्या फुंकतय
घासासंग झुलतय
मधमाशी सम गुंगतय
मातीशी बेईमान होतया ॥5॥
निरागस मन
निष्पाप जन
निस्वार्थ कण
निसंकोच गण
यानांच विस्मरतया ॥6॥
ज्यांच्या जीवावर जगतय
ज्यांच्या जीवावर चार चाकात बसतयं
ज्यांचामुळे बंगलात लोळतय
भारी भारी फोनात बोलतय
पैशाच्या माजानं गप्पात उधळतया ॥7॥
एकच सांगण आता
सर्वच न्याहाळतो दाता
कुणीच कुणाचा नाही भाता
पापास माप करणारी नाही माता