पती देवा विनंती तुम्हाला, न्याय द्या तुम्ही तुमच्या पत्नीला
बालपण गेले भातुकलीच्या खेळात
तुम्ही आला तिच्या जीवनात .
वडील माणसाच्या आपण आज्ञेत.
दोघे रमलो संसारात, नाही विचारले तिने वृत्तांत.
साथ तुमच्या सुख दुःखात. विनंती
करा आठवण तिच्या त्यागाला
पती देवा विनंती तुम्हाला, न्याय द्या तुम्ही तुमच्या पत्नीला.
झाली चार मुलेबाळे.
त्यांच्या गरजा चे झाले जाळे
नात्याने केले वाटोळे
संगतीला आले तुमच्या टवाळे
तुम्ही लागले वाईट संगतीला
पती देवा विनंती तुम्हाला ,न्याय द्या तुमच्या पत्नीला.
तिने सुरू केला देवाचा धावा
माझा नवरा घरात नीट यावा
मुलांना शिकवण ,दिली संस्कार दीप लावा
आईच्या प्रयत्नाचा वसा तुम्ही घ्यावा
वंश वेल गगनावरी तुम्ही न्यावा
मुले लागली अभ्यासाला,
पती देवा विनंती तुम्हाला , न्याय द्या तुमच्या पत्नीला
झाली कृपा मुलावर ,
सरस्वती त्यांच्या बरोबर
शाळेत मुले , हुशार,
कौतुक गावभर,
आली उभारी तुम्हाला, लागले जोमाने तुम्ही कामाला
पती देवा विनंती तुम्हाला , न्याय द्या तुमच्या पत्नीला.
आला पैसा भराभर.
लक्ष्मी सरस्वती मणभर
झाली शिक्षण , सरसर.
आता शोधतो वधुवर
मुले झाली उपवर.
आनंद गेला गगनाला ,उभे लग्न करण्याला.
पती देवा विनंती तुम्हाला , न्याय द्या तुमच्या पत्नीला
सुना जावई नातवंडे सांभाळी आनंदात
दिवस नसे पुरे , त्यासवे खेळण्यात.
बारसे वाढदिवस साजरे करण्यात
झाली भूतकाळ यावर मात
गोकुळ झाले घरात
आला आकार स्वर्गाचा घराला.
पती देवा विनंती तुम्हाला, न्याय द्या तुमच्या पत्नीला
आनंदाला सजली. आजाराची झालर
सहन होईना आता घराचा भार
बदलते सगळ्यांचे विचार
संपला आता आचार
मनात वादळ अपार.
भूतकाळ कष्ट आठवणी आजार लागला मनाला
पती देवा विनंती तुम्हाला , न्याय द्या पत्नीला.
म्हातारी ती आता , सुनेला संस्कार शिकवता
तुम्ही मात्र सुनेचे लाड करता
यात तुम्ही साथ नाही देता
घरात सासू वाईट होता.
तुम्ही अलगद बाजूला होता.
सासरा आवडे सर्व सू नाला ,
पती देवा विनंती तुम्हाला
न्याय द्या तुम्ही पत्नीला
न्याय म्हणजे अहो तो काय
कोण सत्य स्वीकारत नाय
मुलगा बोलत नाही आईला माय
बायको करते करते हाय हाय
माझे कोणी च आता ,शरीर पण नाय
सोडले तिने सर्व पाठी केवळ तुझ्यासाठी, तू हो तिची काठी.
सांग ओरडुन तू घराला, पत्नी कशी साथीला
पती देवा विनंती तुम्हाला , न्याय द्या हो तुमच्या पत्नीला.
समस्त सासरे बुवा यासाठी ही कविता.
महिला दिनी , महिला विशेष.