Bluepad | Bluepad
Bluepad
मोहाची फुलं
वंदना गवाणकर
16th Mar, 2023

Share

बऱ्याच वर्षांपासून आम्ही ऑफीस मधून सरस exhibition ला जायचे कारणं ते शक्यतो बांद्रा येथे असायचे. प्रत्येक गावातून, शहरातून, आदिवासी किंवा गावकरी ह्या exhibition मध्ये आपले स्टॉल लावतात.... पंधरा दिवसांनी आपापल्या गावी परत.
जालना बीड पासून अगदी मध्य प्रदेश, काश्मीर ते गडचिरोली, केरळ पासून लोकं इथे स्टॉल टाकतात. जवळ जवळ साडेतीनशे स्टॉल असतात. एवढ्या लोकांची सोय आपलं सरकार करतं. दोन तीन वर्ष करोनाची ही लोकं येऊ शकली नाहीत.. ह्या वर्षी वाशिला सिडको मध्ये ह्यांना जागा दिली....आम्ही काय तयारच...लोकांचं भल नको व्हायला आणि आम्हाला विरंगुळा.
काल गेलो, तर पहिल्यापासून सगळीकडे मोहाची फुलं ह्यांचे स्टॉल...आमच्या ना ऑफीस मध्ये एक पेपर टाकणारा अन्सारी नावाचा माणूस होता...तो एकदा माझ्या खोकल्यावर बोललेला..' मॅडम हमारे गाव मे ना महुवा का फुल रहता है, उसको सुबह सूबह पानी मे डालके उबालानेका वो पानी पिनेका आपका खासी एकदम चला जायेगा. ' मज्जा वाटली कारण आम्ही मोहापासून दारू बनते एवढंच ऐकलेले..( आपल्याकडे ही फुलं दिसत नाहीत उगाच माहिती कोण काढणार? जेवढं ऐकलं तेवढंच आपलं ).
काल इथे मोहापासून बनवलेल्या भरपूर वस्तू मिळाल्या. गडचिरोली हा भाग आम्ही फक्त नक्षलवादी म्हणून ओळखत होतो, पणं इथले लोक ह्यावेळी भरपूर होते. काही समाजसेवक तिथल्या लोकांना ईथे घेऊन येतात, त्यांचे स्टॉल लावायला मदत करतात. मोहाची फुलं पहिली खाली जमिनीवर पडली की त्यांची पूजा करतात, नमस्कार करून त्यांना उचलतात अस त्यांचं म्हणणं कारण मोहाच झाडं त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. मोहाचं फुलं त्याची फळ सुकवून त्याचे पदार्थ, इंधन, दारू, त्याच्या झाडाच्या सालापासून फर्निचर, सगळ्यात उपयोगी झाडं... आम्ही जेवायला बसलो तिथे ही लोक आमच्या बरोबर जेवायला बसलेली.... इतक्या गोष्टी सांगत होती, आमच्याकडे मोहाची झाड असलेले जंगल आम्ही वाटून घेतो, मग आपापल्या भागाची प्रत्येक माणूस काळजी घेतो. इकडे फक्त भात पिकतो त्यामुळं आमचं जेवणं भात आणि कडधान्य. ज्वारी बाजरी गहू इकडे पिकत नाही...तुम्हाला हवं तर घराच्या मागे पिकवा आणि वापरा तुमच्यासाठी...एवढाच. मग भात परवडतो, नदितले मासे, त्याचं कालवण भात.
मोहाच्या फुलाला गोड चव असते, त्याच्या पुरणपोळ्या, लाडू बनवतात ज्यात साखर किंवा गुळ घालायची गरज नसते. मोहाच्या बिया पासून तेल बनवतात ते त्वचारोगावर उपयोगी असतं, दिव्याला तेच ते वापरतात. एवढी मेहनत करून इथे विकायला आणलेलं त्यांचं सामान लोकांनी कमी किमतीत घेतलं तरं त्यांना वाईट वाटतं ( पणं आम्हाला घासाघीस करायची सवयच आहे फक्त मॉल संस्कृती सोडून ).
पापड, लोणची, कुरडई, मसाले, कडधान्य, ड्रेस साडी, शाल, दुपट्टा ह्या सर्वातून मला आवडलं ते फक्त मोहाचे पदार्थ. पुरणपोळी लाडू...आणि सुकलेली फुलांच एक पाकीट, बघुया खोकला जातो.... का नशा चढते....
तुम्हीं नक्की भेट द्या...१९ तारखेपर्यंत आहे.
🙏 वंदना ❤️

0 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad