Bluepad | Bluepad
Bluepad
दिरांग
धनश्री अजित जोशी
16th Mar, 2023

Share

6:5:23
दिरांगहून निघतानाच गाईड ने सूचना दिली होती..असतील नसतील तेवढे गरम कपडे घालून बसा.कानटोपी , हॅन्डग्लोज जवळच ठेवा.
" जवळच एक बौध्दमठ आहे तो पाहू या. मग पुढे जाऊ ."
गाडी माॅनेस्ट्री जवळ थांबली. चढावरून चालत गेलो..पुढे अप्रतिम मठ..पायर्‍या ही बर्‍याच..पण चढलो..अर्थात तशी मानसिक तयारी होतीच.
अत्यंत अप्रतिम परिसर .मनमोहक फुले..हरीने ..लावलेली..रंगसंगती सुध्दा आकर्षक.लक्ष वेधून घेणारी.अक्षरशः हे पहावे का ते..असे होत होते.फोटो तरी किती काढायचे कशाकशाचे..आकर्षक रंगसंगतीत असलेला तो मठ नजरेचे पारणे फेडत होता..म्हटले तरी चालेल.
आत मध्ये प्रचंड शांतता, प्रसन्नता भरून राहिलेली. कळतनकत बोलती तोंडे गप्प झाली. तिथल्या शांततेचा भंग न करता शांतपणे दर्शन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
निरनिराळ्या फुलांबरोबर फोटो काढण्याचा मोह मात्र कोणालाच आवरला नाही.
आता सेलालेक ला जायचे .प्रचंड थंडी असणार .सगळे तयारीतच होतो.सेला लेकला बरेच अंतर खाली उतरून जायचे होते.थंडी आणि अंतर लक्षात घेता काही जणांनी वरच थांबणे पसंत केले.आम्ही काहीजण मात्र उतरून खाली गेलो.गोठलेला लेक बघायला मज्जा येत होती. .झाशीच्या राणीचा आविर्भावात हातात बर्फाचा डोंगर घेऊन फोटो काढला.
आता मोहिम सेला पास.हवेत प्रचंड गारवा .सेला पासला मिलिट्रीचे शाॅप होते.वाढती थंडी लक्षात घेऊन जाकिटे , हॅन्डग्लोज, कानटोप्यांची खरेदी झाली.
तिथल्या कॅन्टीन मध्ये शोभना ..राजन बेरी यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा केला.मिलट्री कॅन्टीन मध्ये साजरा झालेला हा सोहळा सगळ्यांच्याच कायम स्मरणात राहिल.
नंतर गेलो "जसवंत गड" वाॅर मेमोरियल पाहिला.1962 च्या भारत चिन युध्दात अतुलनीय पराक्रम करून चौकी राखणारे रायफलमन जसवंत सिंग यांच्या स्मरणार्थ त्यानी जिथे आपला देह ठेवला तिथे त्यांचे स्मारक उभारले आहे.
जसवंत सिंह यांचा
IN THE LOVING MEMARY OF
NO4039009
RIFLEMAN JASWAT SINGH.
WHO LAID DOWN HIS LIFE ON17 NOV. 1662 FOR THE DEFENCE OF NURANANG
जसवंत सिंग यांच्या बद्दल ऐकले होते , वाचले होते. स्मारकस्थळी जाताच सगळे आठवले. नकळत हात जोडले गेले.
तिथे असलेल्या जवानाने जसवंत सिंगांच्या पराक्रमाची कथा सांगितली.1962 च्या चीनबरोबरचे युध्द .
17 नोव्हेंबर 1962 चीनबरोबर ने अरुणाचल प्रदेश ताब्यात घेण्याच्या हेतूने हल्ला केला. भारतीय सेनेची एक तुकडी नूरानांग ब्रिज च्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या तुकडीत जसवंत सिंह यांचा समावेश होता.चीनी सेना ताकदीने अधीक होती म्हणून भारतीय सैन्याच्या गढवाल युनिट मधील चौथ्या तुकडीला परत फिरण्याचे आदेश दिले गेले.परंतु या तुकडीतील जसवंत सिंह , लांस नायक त्रिलोकी सिंह नेगी , आणि गोपाल गुसाई हे परत फिरलेच नाहीत. ते गर्द झाडींचा आश्रय घेत लपतछपत चीनी सेनेच्या बंदरावर पोचले वरून गोळीबार होतच होता. त्यांनी पंधरा यार्ड अंतरावरून हॅन्ड ग्रेनेड फेकून कित्येक चीनी सैनिकांना कंठस्नान घातले आणि त्यांच्या मशिनगन काढून आणल्या. त्यामुळे लढाईचे पारडे पूर्ण फिरले चीनबरोबर चे अरुणाचल ताब्यात घेण्याचे स्वप्न धुळीला मिळाले. या गोळीबारात त्रिलोकी , गोपाळ यांना वीरगती प्राप्त झाली . जसवंत सिंहांना शत्रुच्या सैन्याने वेढले आणि त्यांचे डोके कापून घेऊन गेले.यानंतर 20 नोव्हेंबर ला युद्धबंदीची घोषणा झाली.या दिन दिवसात तीनशे चिनी सैनिक मारले गेले.
स्थानिक लोक , जवान यांच्या मते आजही जसवंत सिंह यांचा आत्मा भारताच्या पूर्व सीमेचे रक्षण करतो. त्यांच्या नावाने हे स्मारक उभे केले आहे.
कथा ऐकली अंगावर रोमांच उभे राहिले..भरल्या डोळ्याने त्यांना सॅल्युट केला. उत्स्फूर्त. "जय हिंद."".जय हिंद की सेना "ची घोषणा केली.
जसवंतगड स्मारकाला भेट दिली .तिथे त्यांचे सगळे सामान जपून ठेवले आहे.बाहेर असलेल्या जवानाने माहिती दिली.जसवंत सिंह यांच्या बुटाला आजही रोज पाॅलिश केले जाते. त्यांच्या कपड्यांना इस्त्री केली जाते.शिख तुकडीतील पाच जवान या कामासाठी नियोजित केलेले आहेत. सकाळ संध्याकाळ रोज जसवंत सिंहाचे ताट प्रथम मांडले जाते.रोज सकाळी त्यांच्या कपड्यांना सुरकुत्या पडलेल्या असतात.
जसवंत सिंह सैन्यातील असे एकमेव सैनिक आहेत की मरणानंतरही त्यांना प्रमोशन दिले गेले. ते नायक , कॅप्टन आणि मेजर जनरल झाले ..या दरम्यान त्याचे संपूर्ण वेतन त्यांच्या घरी पोचवले जात असे.
72 तास अन्न पाण्याशिवाय त्यांनी राहून शत्रूचा मुकाबला करत त्यांच्या 300सैनिकांना गारद करणाऱ्या जसवंत सिंग यांना मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेल्या लढ्याची गाथा ऐकून आपण त्यांच्या पराक्रमासमोर आदराने नतमस्तक होतो.
आमची अवस्थाही काही वेगळी नव्हती.डोळ्यातल्या वहाणार्‍या अश्रूंना बांध घालणारी अशक्य होते..
जड अंतःकरणाने बाहेर आलो .
बाहेर एक रायफल धारा सैनिकाचा पुतळा होता.त्याखाली
" IN MEMARY OF THE SOLDIERS WHO LAID DOWN THERE LIFE FOR THE NATION. "
लिहिलेले वाचले.
एकदम मनात आले, तैनात असलेल्या ज्वाला विचारले ," आम्ही इथे राष्ट्रगीत म्हणू शकतो का?"
त्यांनी परवानगी दिल्यावर आम्ही " एक साथ खडे होंगे खडे हो..च्या आदेशात सावधान मध्ये उभे राहून ,
" जन गण मन अधिनायक जय है, भारत भाग्य विधाता.."
म्हणायला सुरवात केली .राष्ट्रगीत म्हणताना मातेच्या संरक्षणार्थ वीर गती प्राप्त केलेल्या जवानांची स्मृती मनात आणि समोर डौलाने फडकणारा तिरंगा होता.
" भारत माता की जय." म्हणताना उरात दाटलेला अभिमान स्वरातून व्यक्त होत होता.
असंख्य उलट सुलट विचारांच्या गुंतत्यात जड मनाने तिथून बाहेर पडलो.
आता आमचा मुक्काम आज तवांगलाच असणार होता.उद्या बुमला पास ला जायचेय .जी भारत चीन ची सीमारेषा आहे.
त्याचे आम्हालाच टेंशन आलंय..तरी बरं ..आपल्याला लढायला जायचं नाही..तरी युध्दाला जायला लागेल तशी तयारी करतोय..प्रचंड थंडी असणारे ..जाकिट..टोपी..कानात घालायला कापसाचे बोळे..भीमसेनी कापूर..ऑक्सिजन लेव्हल कमी असणार आहे..असंख्य सूचना ..एकमेकांना.
सगळे तय्यार करून झोपेची आराधना सुरू केली..
निद्रादेवी प्रसन्न होईना.दिवसभरात काय काय पाहिले याचा पट डोळ्यासमोर उभा राहू लागला..जवान देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात..आपण काय करतो..हा विचार डोकं पोखरून लागला.
" ऐ मेरे वतन के लोगो ,
जरा ऑखमें भरलो पानी
जो शहिद हुएं है उनकी
यदा याद करो कुर्बानी ..
गाणे मनात वाजू लागले त्याने अधिकच अस्वस्थ झाले.आता तर वयाच्या या टप्पावर आपण काहीच केले नाही.फुकटच आयुष्य गेले आपले..उलटसुलट विचारांची गर्दी डोक्यात.
" अग प्रत्येकाने आपले प्राण अर्पण करण्याची गरज नसते ..प्रत्येकाची तेवढी क्षमता ही नसते ..प्रत्येकाने आपले काम चोख केले तर ती देशसेवा असते.असे तूच शिकवले आहेस ना.
" लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर , हिंदवी व्हा चाकर..एक रक्ताचेच आहो..साक्ष देई आतडे.."
मी माझे काम चोख केलंय..जमेल तसे करत राहील..ही देश सेवाच आहे..या विचाराने मन जरा शांत झाले.

0 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad