माझं कुणाशी वैर नाही
वाद नाही वा भांडणही नाही...
वागते कधी कधी स्वतःच्या मनासारखं..
नसेल जमत नेहमी मनं जपायला,
अहो पण मग यात काही गैरही नाही.......
माझं असं कुणाशी वाद वा वैर नाही.
मि मशगुल असते स्वतःच्याच दुनियेत
पुस्तकात हरवते, शब्दांमध्ये गुंतून बसते
चार ओळी अनुभवलेल्या अशीच लिहित असते
त्यांचा तुमच्याशी दूर दूरवर संबंध नाही
दुखवायला कुणाला मि लेखणी वापरत नाही
माझ्या लेखणीचा मि असा अपमान मुळीच करीत नाही
माझं कुणाशी वैर नाही
वाद नाही वा भांडणही नाही......
अपर्णा.