गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
16th Mar, 2023
Share
,*अर्धसत्य हे असत्या पेक्षाही घातक असतं*
अर्धसत्य हे वरकरणी अमृततुल्य दिसणार विष आहे .पण बहुतांश लोक त्याला अचाट अशी बासुंदी समजुन स्वतःही स्वीकारतात आणि इतरांनाही ते स्वीकारण्यासाठी आग्रही असतात.पण हि बासुंदी खाताना लक्षात येत नाही .पण परिणाम मात्र घातक येतात .प्रत्येक क्षेत्रातील अर्ध सत्याचा वावर हा एवढा वाढला आहे कि सत्य हवेत विरले असंच जाणवतं आहे. अर्धसत्या मुळे सत्य दुर्लक्षित होत असल तरी असत्या पेक्षाही अर्धसत्य हे घातक आहे.आज आपण हवेत आहेत पण आपण अर्धसत्यावर स्वार आहेत कुठे पोहचु हे आपल्याला पण समजणार नाही .काल युगात अर्धसत्याचा एवढा प्रचंड बोलबाला आहे कि सत्य पार झाकाळुन गेलं आहे आणि अर्धसत्य हे हेच स्वतःला सत्य म्हणून भासवत आहे . विशेष म्हणजे बहुतांश लोक सुद्धा अर्धसत्यालाच सत्य माणुन तेच अर्धसत्य इतरांना एवढ्या आविर्भावात पटवतात कि असत्याला सुद्धा हसु आवणार नाही . म्हणजे आपण आपली स्वतःची व पर्यायाने इतरांची फसवणूक करतोय . मराठीत याला स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारणे असं पण संबोधलं जातं.असत्य हे आपल्याला निश्चित महित असतं म्हणून आपण फसत नाहीत.अथवा त्या मार्गाने धावत नाहीत त्या अनुषंगाने.आपला महत्वपूर्ण वेळ व्यर्थ वाया जात नाही.पण अर्धसत्य हे दिसण्यासाठी कल्पक भ्रमक असतं पण अंतिमतः भ्रमनिरास करणार ठरत.नुकसानदायी ठरत .सत्य रोचक असतं असत्य हे निश्चित असतं व अर्धसत्य हे भ्रमक असतं . आपल्याला जे निश्चित महित आहे तिथं आपला व्यर्थ वेळ वाया जात नाही.पण जे आपण सत्य समजतो आणि त्या दिशेने धावतो .धावत धावत खुप दुर पर्यंत पोहचल्यावर आपल्याला समजतं आपण अर्धसत्य मार्गावर मार्गक्रमण करत आहेत.मग आपल्याला खूप मोठा पश्चात्ताप करावा लागतो. वास्तवा ऐवजी भ्रमक कल्पनेत फिरणं म्हणजे अर्धसत्य स्वीकारणं . असत्य हे आपल्याला अगोदर माहित असतं हे असत्य आहे.पण अर्ध सत्याला आपण सत्य समजतो आणि खूप प्रचंड दुर गेल्यानंतर आपल्याला समजतं हे अर्धसत्य आहे म्हणून मग तिथुन परत फिरण जवळपास आपल्यासाठी अशक्य प्राय असतं .आशा वेळी असत्या मुळे जितकं आपलं नुकसान होत नाही किंबहुना त्या पेक्षा हि जास्त नुकसान हे अर्धसत्या मुळे होत . म्हणून हे खूप घातक आहेच. आपण ज्या क्षेत्रात कार्य करतोय त्या क्षेत्रातील असो कि जीवनाशी निगडित इतर सर्व क्षेत्रात आपणं जेव्हा अर्धसत्याची शिकार होतो . तेव्हा आपलं स्वतःचं आपल्या सहवासातील इतरांच तसंच आपल्या पुढच्या पिढीच भरून निघणार नाही एवढं नुकसान होत . जे असत्या पेक्षा हजारो लाखो पटीने जास्त असतं . सत्य व असत्य या मध्ये असणारा फरक आंतर आपण त्या क्षणी ओळखतो कारण सत्य व असत्य हे परस्परविरोधी टोक असल्याने त्यांची निश्चित अशी रूपरेषा असते . आणि ती ठळकपणे समजते .पण अर्धसत्य हे तसं नाही पाहताना ऐकायला ते सत्य पेक्षा हि सुंदर दिसत .पण उपयोग क्षणी त्यांचा फायदा नाही तर खुप मोठा तोटा होतो. म्हणून अर्धसत्य हे आपल्यासाठी आपल्या भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी घातक आहे निरुपयोगी आहे.अहितकारक आहे . त्यापासून आपण वेळीच जागृत होणं गरजेचं आहे स्वतःला सावरुन सावध ठेवण हे तितकेच महत्त्वाचे आहे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301
2
Share
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक