माझ्या देशाची सभ्यता रडत आहे ,
एका कोपऱ्यात बसून ती कोमजत आहे
हुंदके भरुनी रडत आहे ,
माझ्या देशाची सभ्यता रडत आहे .
साडीला मागे सोडूनी जिन्स वर नाचत आहे ,
सभ्यता सोडूनी फाटके वस्त्र नेसत आहे .
फॅशनच्या नावाखाली अश्लीलता वाढत आहे,
माझ्या देशाची सभ्यता रडत आहे.
युवकांचे प्रेरणास्त्रोतच त्यांना संस्कारहीन बनवित आहे,
दयुत
मदिरेचा प्रचार वाढत आहे.
माझी संस्कृती कुठेतरी लुप्त होत आहे,
भारत भूमी का बदलत आहे?
श्रद्धा निर्भया सारखे प्रकरण घडत आहे,
माझ्या देशाची सभ्यता रडत आहे.