लोकल ट्रेन मध्ये शहाड-कल्याण, दरम्यान या बाबांना बऱ्याचदा पाहतो. खांद्याला अडकवलेली कापडी पिशवी, हातातील प्लास्टिकच्या पिशवीत गोळ्या, लाची गले की सफाई, असं बसलेल्या आवाजात यथाशक्ती ओरडत प्रवाशांच लक्ष वेधून घेऊन गोळ्या विकण्याचं काम हे बाबा या वयात करतायत हे पाहून वाईट वाटतं.
त्यांच्याशी थोडं बोलल्यावर त्यांनी सांगितलं, सोमनाथ कपूर त्यांचं नाव. आज त्यांचं वय ९१ वर्षांच आहे, शरीर साथ देत नाहीय, डोळ्यांना अंधुक दिसतंय, पण भीक मागणार नाही, मरेपर्यंत कष्टाचंच कमवून खाईन, हा त्यांचा निर्धार आहे. पण एखादं भला माणूस मला पाच दहा रुपये देऊ करतो, हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं मी त्यांना त्या बदल्यात गोळ्या देतो, कधी तें घेतात, कधी एखादं दुसरीच गोळी, लाची घेतात.... कधी नाही घेत, अस घडत, कधीतरी अस कपूर बाबांनी सांगितलं.
हजारो वृद्ध आज एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यात कितीजणांना सोमनाथ कपूर यांच्यासारखा स्वाभिमानीपणा जपता येत असेल? ते आजारी पडत असतील तर त्यांची मायेने विचारपूस करणार कोणी नाही, बोलायला, फिरायला ऐकायला कुणी नाही. अशा एकाकी जगणाऱ्या वृद्धांच्या मनात काय विचार येत असतील...
मी पाच रुपयांच्या गोळ्या घेतल्या बॅगेत ठेवल्या. आता ऑफिसमध्ये बॅग उघडली त्या गोळ्या दिसल्या व या ओळी मनात दाटल्या. कधीतरी ट्रेन मध्ये तुमची सोमनाथ बाबांबरोबर भेट झालीच तर त्यांच्याकडून दोन/ चार रुपयांच्या कांही गोळ्या जरूर विकत घ्या. बघा तुम्हाला लाख रुपयांच समाधान लाभेल !