Bluepad | Bluepad
Bluepad
आधुनिक समाज माध्यमांचे अपयश
निवृत्ती माधवराव सावरकर
निवृत्ती माधवराव सावरकर
15th Mar, 2023

Share

मुळामध्ये मनुष्य हा एकटा जन्माला येतो आणि या जगातून जाताना या जगाचा निरोप घेताना एकटाच जातो जीवनाच्या शेवटच्या प्रवासाला तो एकटाच प्रवासी असतो त्याच्या समवेत कोणी सहप्रवासी होऊ शकत नाही किंवा नसतो तरीही मनुष्य हा समाजशील प्राणी आहे जोपर्यंत तू जगतो तो समाजाचा अभाज्य घटक असतो तो समाजशील असतो समाजाशी त्याचं घेणं देणं सोयरासुतक असतं पूर्वी जेव्हा आधुनिक प्रगतीची एवढी साधने नव्हती तेव्हा सुद्धा समाजात आपसात संपर्क साधण्यासाठी एकमेकांच्या जवळ येण्यासाठी विचारांच्या आदान प्रदान साठी कालीन माध्यम होती फरक इतका आहे की ती माध्यम किंवा ती समाज माध्यम प्रत्यक्ष स्वरूपाचे होते त्याला विशिष्ट कार्य प्रसंग घटनाक्रम किंवा पार्श्वभूमीची बऱ्यापैकी गरज लागायची म्हणजेच गावात कोणाकडे वाईट प्रसंग घडला दुःखाचे घटना घडली त्यानिमित्ताने लोक एकत्र यायचे तिथे एकमेकांचे हितगुज विचार आहे कुशल विचारायचे गावात कोणाचं लग्न कोणता भंडारा किंवा जत्रा असायचे त्यानिमित्ताने लोक एकत्र यायचे या माध्यमातून विचारांचा आदान-प्रदान संस्कृतींचा आदान प्रधान परंपरा आणि विचारांचा आदान प्रदान व्हायचं तेव्हाची समाज माध्यम ही प्रत्यक्ष होते मानतो की दळणवळणाची प्रवासाची संसाधन कमी होते त्यामुळे माणसं भौगोलिक दृष्ट्या दूर होते पण मनाने मात्र ते खूप जवळ आणि मनाच्या नात्याने घट्ट जोडलेली होती हळूहळू प्रगती होते कागद आला कागद आला तर कागदापासून पत्र आलं मग आंतरदेशीय पत्राला त्यानंतर तार आले तारेच आता आपलं आगळवेगळे महत्त्व आहे तार आली म्हणजे अत्यंत आनंदाची बातमी असेल नाहीतर अत्यंत दुःखदायक आणि तिसरा भाग मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण न टाळता येणारी बातमी किंवा घटना असेल तेव्हाच तार यायचे मग पत्र काळाच्या पडद्याआड जायला लागलं किंवा ते गेलं त्या जाग्यावर लँडलाईन फोन आला फोनची एक रिंग वाजली की पाचशे हजार दहा हजार एक लाख किलोमीटर अंतरावर असलेला आपला नातलग आपल्याशी बोलू शकत होता आपण त्याला पाहू शकत नव्हतो पण त्याचा आवाज ऐकू शकतो तेवढाच मनाला आनंद आपल्या व्यक्तीशी बोलण्याचा समाधान आणि मनःशांती सुद्धा त्यानंतर आला तो मोबाईल तोही हळूहळू उत्क्रांत होत गेला पूर्वी जो मोबाईल केवळ बोलण्याच्या कामात येत होता त्यात आता कॉलिंग साठीच वेगवेगळे प्रकार अवेलेबल आहे सिंगल कॉलिंग मध्ये एका व्यक्तीला कॉलिंग एका वेळी अनेक व्यक्तींच्या कॉलिंग साठी कॉन्फरन्स कॉलिंग त्यानंतर कॉन्फरन्स व्हिडिओ कॉलिंग सुद्धा आहे त्यानंतर व्हिडिओ कॉलिंग आणि केवळ कॉल करणारा हा मोबाईल आता एकावेळी अनेक कामा करतो तुमच्या आणि माझ्या जीवनाचा अविवाज्य भाग झालेला हा मोबाईल श्वास घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पेक्षाही मोठा होत चालला आहे किंवा झाला आहे आणि याच मोबाईल ने किंवा त्यातल्या इंटरनेटने आपल्याला नवीन समाज माध्यम परस्पर संपर्कासाठी मित्र निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे आपण त्या समाज माध्यमांना बऱ्यापैकी ओळखता आणि जाणता सुद्धा पण आज आपला चर्चेचा विषय आहे की या आधुनिक समाज माध्यमांचा उदय ज्या उद्दिष्टाच्यावर झाला होता की ही समाज माध्यम भौगोलिक दृष्ट्या दूरवर असलेल्या माणसांना जवळ अनिल आणि भौगोलिक दृष्ट्याच काय शारीरिक वैचारिक आणि मानसिक दृष्टही जवळ आणे पण आधुनिक समाज माध्यमांचा हे उद्दिष्ट ज्या दिवशी पासून समाज माध्यम उदयाला आले प्रचार प्रसार पावले घराघरात पोहोचले आता हातात पोहोचले मी तर म्हणेल बोटा बोटात पोहोचले तेव्हापासून हे उद्दिष्ट भरकटत गेल्याचं मला जाणवते
खरंतर माझ्या मते आधुनिक समाज माध्यमांनी वैचारिक आणि मानसिक आदान प्रधानाला मार्ग मोकळा करून तर दिलाच पण या मार्गावरची वळण किती धोक्याची आहेत याची दखल याची ना समाजाने घेतली ना शासन प्रशासनाने आणि ना या आधुनिक समाज माध्यमांचे संचालन करणाऱ्या कंपन्यांनी घेतली आधुनिक समाज माध्यमांचा वापर करणे बाबतीत मी विरोधी नाही जरूर करा त्या माध्यमातून मैत्री सुद्धा करावी नवीन संबंध सुद्धा निर्माण करावेत परंतु ज्या कारणासाठी लोक आधुनिक समाज माध्यमांचा वापर करत आहे बरेच लोक हे स्वतःच्या व्यक्तिगत चिंता दुःख प्रश्न यांनी ग्रासलेले आहेत प्रत्येकाला कोणीतरी जवळच असायला हवं बोलायला त्या एकाच करण्यासाठी लोक येथे मित्र शोधतात किंवा मैत्रिणी शोधतात अशावेळी अशा माध्यमातून बऱ्याच जणांच्या फसवणूक होतात बऱ्याचदा पैशाने फसवल्या जाते तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा भावनेशी खेळून भावनिक दृष्ट्या ही बऱ्याच जणांना फसवले जाते आणि माझ्या मते ही या संस्कृतीतली आणि या समाजातली आजची सर्वात मोठी विकृती आहे की माणसे जवळ आणणारा समाज माध्यम ही मुळात समाजाचा आरोग्य आणि समाजाचा ढाचा आणि समाजाचा कणा मोडण्याचा काम करत आहे समाज माध्यमांवर घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी लक्षात घेता समाज माध्यमांमध्ये अनेक सुधारणा झालेले आहेत प्रायव्हसी पॉलिसी बऱ्यापैकी सुधारले आहेत आता प्रत्येक समाज माध्यमांवर लॉक ठेवण्याची सुद्धा सुविधा आहे पण मुळात समाज माध्यमांच्या उत्पत्तीचे उद्दिष्ट कुठे जात आहे यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे आणि थोडी ही समाज माध्यम मर्यादित करण्याची गरज आहे समाज माध्यमांचा प्राथमिक उद्देश होता जवळपासच्या परिसरातील स्थानिक परिस्थिती लोकांना जोडणे पण आज याला विश्वव्यापी स्वरूप देऊन जग जसं जवळ आणण्याचा प्रयत्न होत आहे तितकेच माणसे दुरावत आहेत हे समाज माध्यमांचा सर्वात मोठी शोकांतिका म्हणता येईल घरात भरलेले कुटुंब असताना बाहेर मैत्री शोधणे बाहेर मित्र किंवा मैत्रिणी शोधणे बाहेर आपलं खाजगी जीवन खुला करणे आपला दुःख आपल्या वेदना आपल्या चिंता न बघितलेल्या व्यक्तीसोबत सहज सहज शेअर करणे ही खूप मेघातक असल्याचं मला वाटतं असं म्हणतात आरडीएक्स किंवा बॉम्बने जग उडवल्या जातात पण आज सामाजिक माध्यम चालता फिरता जिवंत बॉम्ब बनलेले आहे की हा बॉम्ब कोणाचे आयुष्यात जबरदस्त स्फोट घडवून आणू शकतो आणि ते आयुष्य उध्वस्त होऊ शकते आधुनिक समाज माध्यमांचा वापर करताना वापर करताना आणि नियंत्रकाला दोघांनाही विनंती आहे की आधुनिक समाज माध्यम जितकं वास्तववादी बनवता येईल त्यासाठी प्रथमता प्रयत्नशील असा आधुनिक समाज माध्यमांच्या वापरावर माझा विरोध नाही वापर जरूर करा उलट अधिकारी पण सकारात्मक मार्गाने तो वापर करा तुमची व्यक्तिगत तुमची व्यावसायिक नोकरी विषयक प्रगती तुमची आर्थिक प्रगती तुमची सांस्कृतिक वैचारिक प्रगती प्रगतीच्या प्रत्येक आया मला स्पर्श करताना ही सामाजिक माध्यम त्या प्रगतीच्या आयाम गाठण्याचे प्रत्येक वेळेस साक्षीदार असावेत इतकच जरूर प्रगती करा मित्र जरूर वाढवा देशात नाही परदेशात वाढवा पण हे करत असताना स्वतःच्या घरापासून कुटुंबापासून दुरावल्या जाणार नाही ही जबाबदारी जितकीच व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीची खाजगी जबाबदारी आहे तशीच ती सामाजिक माध्यमांचे सुद्धा आहे सामाजिक माध्यमांना एकच विनंती आहे ही माध्यमे जेवढी वास्तववादी होते तेवढे त्यांचे उपयोगिता वाढेल आणि वास्तव वादाला आधार आणि संमतीजन्य वातावरण देण्यासाठी कायदा सुव्यवस्था आणि व्यक्तीची व्यक्तिगत सुरक्षितता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण व्यक्तीची व्यक्तिगत सुरक्षिततेची आम्ही जर सामाजिक माध्यमांवर पुरेशी नसेल तर कोणतीही अनोळखी व्यक्ती दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या जवळ घेण्याचे धाडस करणार नाही जेणेकरून समाज जोडण्याचं हे समाज माध्यमांचा स्वप्न होणार आहे त्यामुळे व्यक्ती परत्वे प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत सुरक्षितता हे समाज माध्यमांची पहिली प्राथमिकता असायला पाहिजे
पण समाज माध्यम आज केवळ एका विशिष्ट विचाराच्या प्रचार प्रचाराचा बोथट साधन बनत आहे मुळात मनुष्य जीवनात विचारांच्या अनेक पक्षांना जीवनाचा अनेक पैलूंना महत्त्व आहे जागा आहे अशा अनेक विषय आहेत की ज्यांच्यावर ज्ञानार्जन आणि ज्ञानदान आणि ज्ञानप्रसाद हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो ते सर्व विषयांना सामाजिक माध्यमांवर समान दर्जा आणि समान उपलब्धता करून देणे हे सामाजिक माध्यम नियंत्रण समूहाचे काम आहे आणि सोबतच सामाजिक माध्यमांचा प्रभावी रित्या वापर केल्याने काय काय प्रभावी आणि सकारात्मक बदल होतात हेही आपण अभ्यासले आहे पण या माध्यमांचा वापर बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीने नकारात्मक गोष्टींचा प्रचार प्रसार आणि सध्या तर सांस्कृतिक आक्रमणाचा एक प्रभावी माध्यम म्हणून आधुनिक समाज माध्यमांकडे पाहिले जाते हे सांस्कृतिक आक्रमण थेट आणि मेघातक जरी होत नसेल तरीही सांस्कृतिक आक्रमण फार विचारपूर्वक आणि नियोजन बद्दल इथे केल्या जात आहे यासाठी आधुनिक समाज माध्यमांचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे हे हत्यार चुकीच्या व्यक्तींच्या हातात खोलीत न बनता हीच हत्यार क्रांती आणि समाज विकासाचे महत्त्व कोण साधन बनाव ही आपल्या सर्वांना विनंती करतो आज आधुनिक समाज माध्यम हळूहळू शोषणाचा अंतिम अड्डा बनत आहे त्यामुळे व्यक्ती म्हणून परस्परांवरील विश्वास कोलमडत आहे आधुनिक समाज माध्यमांचे आणखी एक समस्या ती म्हणजे ओरिजिनॅलिटीचा म्हणजेच वास्तविकतेचा पूर्णतः अभाव
मुळात आपण नामक जगामध्ये गर्दीच्या आभासात खरे मित्र शोधतोय पण इथे खरे मित्र नाही तर केवळ आपल्या प्रमाणेच एकटे असणारे आणि अपूर्ण असणारे भेटतात सोशल मीडियाच्या जग भामक जगात लाखोंच्या गर्दीचा भाग असणाऱ्या आपण वास्तविक आपापल्या व्यक्तिगत जीवनात खूप एकटे असल्याचे जाणवते आणि या जगात जे तुमचे सोबती आहे ती केवळ एक कल्पना आहे खरा मित्र किंवा खरी मैत्रीण या फेसबुकच्या ब्राह्मण घेण्यात अशक्यप्र आहे चमत्कार वाटतो मी असं लिहितोय म्हणजे माझी निराशा माझ्या शब्दांमधून व्यक्त होत्या असं नाही मुळातच स्वतःच आनंदी असतो त्याला बाहेर आनंद सोडण्याची गरज नाही आनंद तुमच्या स्वतःत आहे तू जर तुम्हाला फेसबुकची मी घेऊन हातात शोधायचा असेल तर तो कधीच सापडणार नाही या पोस्टच्या माध्यमातून एवढेच विनंती आहे फेसबुक वापरा जरूर मैत्री करा परंतु मैत्री जर केली तर ती वास्तविक करा उगीच ब्राह्मक आणि फसवणारे नको अशी जरी आपण रास्त अपेक्षा करीत असलो तरी ती अपेक्षा या स्तरावर फोन करत आहे म्हणून आधुनिक समाज माध्यमांना जिथे सामाजिक आणि कायदेशीर नियमांचे अवलंबन होतंय तिथे काही बंधन घ**** ही नैतिक मर्यादा आहे त्या बाबतीत सामाजिक माध्यम सपशेल अपयशी ठरण्याची दिसत आहे च्या माध्यमातून विचारांचे आदान प्रदान मनाचे मनमोकळे पण अनुभवायला पाहिजे तिथे आज माझ्या मते निरर्थक नाहक टाइमपास आणि मनाला रुतणाऱ्या आणि माणूसपणावर प्रश्नचिन्ह ठेवणाऱ्या अशा अनेक घटना वाचायला पाहायला मिळतात मुळात ज्या उद्दिष्टासाठी सामाजिक माध्यमांची उत्पत्ती झाली किंवा निर्मिती झाली ते उद्दिष्ट म्हणजे मैत्रीला वाव देणे ते तर कदाचित कधीच मागे पडलेले आहे फेसबुक नामक जगात जगणारे आज एक काजवा होऊन बसलेले आहेत सूर्याच्या तेजाची क्षमता असताना सुद्धा काजव्यासारखं जीवन व्यतीत करण्याची वेळ येते तेव्हा प्रश्न एकच पडतो की आधुनिकता आपल्यासाठी आहे की आपण आधुनिकतेसाठी आपण आधुनिकतेच्या आश्वास वार व्हायला हवे, नाकी आधुनिकतेचा बलाम व्हायला आधुनिक प्रसार माध्यमांचे समाज बांधवांचे एवढेच अपयश आहे की जी परिस्थिती आणि चूक भूगोल या देशाचा आहे इतिहास या देशाचा आहे समाज मन या देशाचे समाजाचे आहे ते कुठेतरी हरवत आहे किंवा हरवले आहे आधुनिक समाज माध्यमांचा अपयश चिंतेचा विषय असला तरी त्यातून तोडगा एकच की माणसे जोडण्याच्या जुन्या पद्धतीला आपण सर्वांनी पुन्हा एकदा अंगीकार आहोत थोडा फोन सोडून सोशल मीडिया सोडून माणसांमध्ये पुन्हा परत यावं इतकच

0 

Share


निवृत्ती माधवराव सावरकर
Written by
निवृत्ती माधवराव सावरकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad