दुपारी बारा वाजता सुभाष दीक्षित ची कार फार्म हाऊस मध्ये दाखल झाली. रमण ने त्यांचं सामान बाजूच्या रो हाऊस मध्ये शिफ्ट केलं. शितल व स्नेहल दोघी आपल्या रूममध्ये होत्या.
"मम्मा मला फिरायला घेऊन चल ना गं . "शितल स्नेहलच्या गळ्यात हात घालत म्हणाली.
"बेटा आता मी घरी बरीच मंडळी येत आहे ते तुला भेटतील ना". स्नेहल तिला समजावत म्हणाली.
"अगं म्हणूनच तर गर्दीतून बाहेर जाऊन फिरून येऊ. मी फार बोर झाले ग असं पडून पडून". ती रडवलेला चेहरा करत म्हणाली. पायल आत येत असताना तिने हे ऐकले.
"स्नेहल एक करू आज सायंकाळी आपण हिला गार्डनमध्ये घेऊन जाऊ. "पायल म्हणाली.
"हो ताई आता मला पण थोडं चेंज म्हणून बाहेर जावं असं वाटतंय". स्नेहल म्हणाली.
"चला तर मग आज सायंकाळी पाच लाच आपण गार्डन मध्ये जाऊ ". पायल म्हणाली. तेवढ्यात पायल चा फोन वाजला.ओके मी येतो.