आपण पुस्तके बरीच वाचत असतो, पण त्यातील काही पुस्तके अशी असतात की ती पुस्तक कायम स्वरुपी आपल्या मनात आणि घरात कायम असतात. त्यातलं च एक पुस्तक म्हणजे संपूर्ण चातुर्मास हे होय.
हे पुस्तक म्हणजे आपले सणवार धार्मिक विधी व्रत वैकल्ये पुजा विधी सर्व स्तोत्र ह्यांची संपूर्ण माहिती असलेल पुस्तके आहे.
ह्या पुस्तकाची गरज प्रत्येक कुटुंबाला वेळोवेळी पडत असते.
कित्येकदा सत्यनारायण पुजेला किंवा गणपती स्थापनेसाठी गुरुजी न मिळाल्यास आपण ह्या पुस्तकात दिलेल्या पुजाविधी नुसार घरच्या घरी यथा सांग पुजा करु शकतो.
रामाचा पाळणा कृष्णाचा पाळणा, मंगलाष्टके , सगळ्या देवी देवतांच्या आरत्या , प्रार्थना , मंत्र पुष्पांजली हयाची सर्व माहिती आपल्याला एकाच पुस्तकात मिळते.
मला ह्या पुस्तकातला सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे सचित्र काहणी व पुजा.
आपण सण तर साजरा करतो. पण तो साजरा करण्या मागचा नेमका उद्देश काय आणि महत्व काय आहे. हे ह्या पुस्तकात सविस्तर दिले आहे.
हे पुस्तक म्हणजे एका अर्थाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिलेले संस्कार संस्कृती चा वारसा आहे.
प्रत्येक सणवार उत्सव व्रत वैकल्ये अशा प्रत्येकच विधी साठी आपल्याला ह्या पुस्तकाची गरज आहे.
संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक म्हणजे आपल्या सर्वांना साठी अमुलय ठेवा आहे.
लेखकानी हया पुस्तकात सर्व गोष्टी अत्यंत सरळ सोप्या भाषेत सांगितल्या आहेत.
आई तर हेच म्हणत असते अग संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक वरच ठेवत जा म्हणजे पुजेच्या वेळी ते पटकन सापडेल.
ह्या पुस्तकातला इतकं मानाचं स्थान आहे, म्हणून ते मला जरा जास्तच आवडत.
अरुंधती धर्माधिकारी कुंडले
भुमकर नगर
वाकड पुणे