Bluepad | Bluepad
Bluepad
सुखाचा पासवर्ड*     ।।ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा..।।
7
7878
15th Mar, 2023

Share

*✧═════════•❁❀❁•═════════✧
*सुखाचा पासवर्ड*
    ।।ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा ।।
✧═════════•❁❀❁•═════════✧*
काही दिवसापुवीॅचे प्रसंग काळजात कोरुन ठेवावेत असे अजीबातच नाहीत.समर्थ म्हणतात, जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावै.."आपणही सोडुनच ते द््यायला हवेत.अनेकदा आपल मधून ह्या गोष्टीत रमत आपण उगाच या गोष्टी चघळत बसतो.उगाचच कुणाकडुन मानाची, आपुलकीची अपेक्षा बाळगतो.हेच दु:खाच कारण अस तथागत म्हणतात.काहीजण मात्र हे सतत उगाळत जातात.तेथुनच कुरबुरीची,वादाची,दु:खाची नदी उगम पावते.ही एक बाजु आता दुसरीकडची बाजूही समजुन घेवु या.
अनेकदा असे प्रसंग घडतात. नातेवाईक आपल्याकडून नुसत्या अपेक्षाच करतात.त्यांना वाटत तो आपला अधिकारच आहे.माझ्या मित्राने सांगीतलेला प्रसंग तो आपल्या मुलाला अॅडमिशन देण्यासाठी बेंगलोरला गेला.तिथे त्याची भाची होती.कराव लागेल.ती श्रीमंत तीने मामाला परस्पर कटवल.याच कारण तीच्या स्टेटसला हे भावणार नव्हत.शहरातल्या नातेवाईकाबद्दल तर न बोलणच बर,त्यांचा सेड्युलच बिघडतो.म्हणून ते सोयीस्कररीत्या आपली विल्हेवाट लावतात.याउलट नातलगांची श्रीमंती पाहुनच ते मान देतात. गरीब नातेवाईक कुणालाच आवडत नसतात.खरतर,ते आले नाहीत तरी,आले तरी त्यांना ताप होतो.आले तर त्यांच्या स्टेटसला बाधा येते.
नात्यांना कामापुरत वापरायच अन सरळ फेकुन द्यायच.हेच जर मामाकडून घडल असत तर?अनेक ठिकाणी बहीण व भावापैकी एक श्रीमंत असेल तर त्यांच स्टेटस अडव येत.वाचनात आलेली एक छानशी कविता खुप काही सांगुन जाते,
भपकेबाजपणा, झगमगाटामागे दिखाऊपणाचा किती खोटा आव अहंकाराच्या कौतुकात दिसतो मग विचारांचा अन् संस्काराचा अभाव...
मनाची श्रीमंती दाखवायला मन तेवढं स्वच्छ अन् निर्मळ असावं लागत परोपकाराचं देणं मात्र खरंच आपलं आयुष्य उजळून देत असतं...
मनाची श्रीमंती सहानुभूती अन् जगडूण्यातली निस्वार्थ भावना जागवते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणुसकीची रीत जोपासायला शिकवते...
आचरण, नम्रता, भाव यातून उपजत जातो जीवनाचा एक विचार घडण होत जाते आयुष्याची जाणता जीवधूनाचे सार ....
चिरकाल काहीच नाही या जगात पैसा, सौंदर्य, प्रतिष्ठा अथवा संपत्ती ज्याची चिरंतन किंमत अगणिक समाधान देते तीच आहे मनाची श्रीमंती..
नात्यांचा सन्मान जपावा तरच दिर्घकाळ नात टिकत.अनेकदा काही नातलग कुत्सीतपणे बोलतात."आता काय?तुला आमची आठवण येते?"त्यावेळी ते मात्र असेच रमलेले असतात.बोलण,वागण निर्मळ असाव,माणसांची जिव्हा हे असे इंद्रिय आहे की त्यावर संयम खूप अवघड आहे. मग तो बोलण्याचा असो अथवा खाण्याचा. याठिकाणी आपल्या बोलण्यावर संयम कसा ठेवावा. याविषयी सांगताना समर्थ दृष्टांतातुन ऊपदेशितात,
आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस जाला ।
आपणावरुन दुसर्‍याला । राखत जावें।।
आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. हें लक्षांत ठेवून दुसर्‍याला दुःख देऊं नये.आपल्याशी जर कोणी गोड शब्द बोलले तर मनाला आनंद होतो, हा तर आपला अनुभव आहे मग स्वतः वरून दुसऱ्याला आपल्यासारखेच मानावे असे समर्थ सांगतात. कोणी आपल्याशी कठोर बोलले तर मनाला यातना होतात. मग आपण कोणाला कठोर बोलताना निश्चितच असंख्य वेळा विचार केला पाहिजे. आपल्याला चिमटा घेतला तर आपल्याला वेदना होतात हे लक्षात ठेवून दुसऱ्याला दुःख देऊ नये. जेव्हा एखादे काम समूहामध्ये करत असाल व जगतानाही लोकांचा संग्रह करावा लागतो.तो करावयाचा असेल तर कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे. कारण अशी वाणी दुसऱ्या बरोबर स्वतःचा देखील नाश करू शकते. पेराल तेच उगवेल या निसर्गनियमाप्रमाणेच आपण जे पेरतो तेच उगवते.हा नियम आहे. आपलं जसे बोलतो तसेच प्रतिउत्तर येते याचेही भान असावे.विनाकारण कठोर आणि कटू शब्द बोलले जाणार नाहीत. कठोर वाणी असणाऱ्यांची निर्भत्सना होते. ज्यांची वाणी कठोर आहे, जे तोंडाळ, शीघ्रकोपी, आहेत त्यांनां समर्थांनी राक्षस म्हणून संबोधले आहे. लोकसंग्रह करताना 'माझेच म्हणणे खरे' असे म्हणून चालणार नाही. लोकांना बरोबर घेऊन कार्य पूर्ण करावे. सैन्यावाच ून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही त्याचप्रमाणे नेतृत्व करणारा अनेकांशी भांडून एकटा कार्य करू शकत नाही. त्याने कार्य करताना सर्वांना आपलेसे करून ठेवावे.तेव्हा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने या सूत्रांचा निश्चितच विचार करणे गरजेच आहे.त्याचबरोबर ज्यांना आपली किंमत आहे.त्यांना जपायच, ज्यांना आपली किंमतच
नाही अशांपासुन दुर रहायच मग ते कितीही जवळचे असोत वा कितीही मोठे असोत.माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते तर,तो इतरांची किती किंमत यावरुन त्याची किंमत ठरत असत.'त्यांना सोडुनच द्यायच.अशीच सोशल मिडीयावर वाचलेली कथा इथे ठेवावीसी वाटते
मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, 'माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो. तू दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की, मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पाहा. मुलगा दागिन्यांच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, 'त्यांनी १५० रुपये ऑफर केले. कारण ते फारच जुने आहे.' वडील म्हणाले, 'आता तू भंगाराच्या दुकानात जा.'
मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला," त्यांनी २०रुपये ऑफर केले. कारण ते खूप खराब झाले आहे. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. म्हणाला, 'बाबा, क्युरेटरने या दुर्मीळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख रुपयांची ऑफर दिली आहे.' वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, 'मला तुला हेच सांगायचे होते की, योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत आहे, तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या. म्हणजे अशा व्यक्तीपासून दूर राहा, ज्यांना आपली किंमत नाही.
. ______✍🏼चंदू चक्रवार©
॰ *✧═════════•❁❀❁•═════════✧*

0 

Share


7
Written by
7878

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad