एखादी व्यक्ती जन्मास येते तेव्हा त्याच्याकडे फक्त श्वास असतो, त्याला त्याचे नाव ही नसते. त्याचप्रकारे जेव्हा ते व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याच्याकडे फक्त नाव असते जगण्यासाठी श्वास नसतात आणि या दोन्हींमध्ये असणारे अंतर म्हणजे आयुष्य होय.आयुष्य हे सर्व जीव - जंतू ,प्राणी,पक्षी वा सर्व सजीवांना असते ,परंतु या सर्वांमध्ये मानवी आयुष्य हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. सर्वांना आयुष्य भेटते ,काहींचा जीवनकाळ हा लघु तर काहींचा दीर्घ असतो. परंतु भेटलेल्या कालखंडामध्ये आपण आयुष किती जगलो यापेक्षा ते कोणत्या प्रकारे जगलो हे जास्त महत्वाचे ठरते.....
पूर्वी अन्न ,वस्त्र ,निवारा या व्यक्तीच्या जीवन जगण्याकरिता च्या मूलभूत गरजा असायच्या ,परंतु आजच्या काळामध्ये याबरोबरच अनेक गरजा यामध्ये समाविष्ट झाल्या आहेत.सुख, संपत्ती,वैभव ,इत्यादी हे आयुष्य जगण्यासाठी आवश्यक साधने आहेत का ? तर हो नक्कीच आहेत.त्यामुळे तर व्यक्ती आपले संपूर्ण जीवन हे पैसे कमावण्यामध्ये घालवतो कारण जगण्यासाठी पैसा हादेखील महत्वाचा घटक ठरतो. परंतु यशस्वी आयुष्य जगण्यासाठी अनेक गोष्टी लागतात जसेकी जिद्द,चिकाटी, आणि या सर्वांमध्ये महत्वाचे ठरते ते समाधान.एखाद्या गरीब व्यक्ती चे जर हतावरचे पोट आहे आणि तो त्यात समाधानी आहे आणि याविरुद्ध एक गडगंज संपत्ती असलेला श्रीमत् व्यक्ती आहे परंतु तो समाधानी नाही तर या दोन्हींमध्ये जास्त सुखी कोण तर अर्थातच तो गरीब व्यक्ती.आयुष्य जगताना हेच तर हवे असते ,जर आपण समाधानी असेल तर आपण नेहमी आनंदी असणार,आणि आपले स्वस्थ हे देखील चांगले राहील म्हणजेच एकंदरीतच आयुष्य जगण्यासाठी आनंद,स्वस्थ, समाधान हे देखी अत्यंत महत्वाचे घटक ठरतात. एखादी व्यक्ती तर सतत आनंदी असेल किंवा त्याच्या आयश्यात तर दुखः नसेल तर त्याला आयुष्याची किमया राहणार नाही त्यासाठी जीवनामध्ये सुखाबरोबर दुःख देखील महत्वाचे असते.जीवनात सुख आणि दुःख दोन्ही समान असतात.आज दुःख असेल तर उद्या सुख असणार आहे आणि आज सुख असेल तर उद्या दुःख येणारच हे जीवनचक्र नेहमी चालूच राहणार.संकटाच्या वेळेस खंबीरपणे समस्येला दोन हात करून त्यातून यश मिळवणे हे महत्वाचं असते..त्यामुळे आयुष्यामध्ये मे सुखी नाही, मी हतबल आहे,असे नकारात्मक विचार ठेवायचे नाही .कारण संकट सर्वानाच येतातानी सर्वांनाच त्याचा सामना करावा लागणार . आपल्यामध्ये असणार आत्मविश्वास आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जायला भाग पाडतो. यातून कधी यश भेटेल तर कधी अपयश परंतु अपयश आले म्हणून ना थांबता न डगमगता परत यशाकडे वाटचाल करणे हेच तर सुखी आयुष्य जगण्याचा मंत्र आहे..
आपले आयुष हे स्वाभिमानाचे असावे, लाचारीचे नसावे.आपले आयुष्य हे खूप अनमोल आहे,प्रत्येक क्षणांमधुणापण एक नवीन धडा शिकत असतो, mhanunapan जीवनामध्ये नेहमी आनंदी ,सुखी आणि समाधानी राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा दिवस शेवटचा असेल समजून आलेला दिवस भरभरून जगायचा काय माहिती उद्याचा दिवस आपण पाहू शकणार आहोत की नाही !! त्यामुळे आलेला दिवस हा भरभरून जगायला शिकल पाहिजे....
धन्यवाद !!!
लेखक : पारशेट्टे ऋत्विक राजेश्वर.