खरंच आज मी च मला मागे वळून पाहिलं. मी च का ही.तो गत काळात केसात माळे लेला सोनचाफा, मोगरा, जाई, जुई, अबोली, नि शेवंती. ही फुल, त्यांचे गजरे, चमचम चे पेपर नि नि हिरवी पाने मध्ये मध्ये ओवुन केलेली वेणी.केसात गजरे माळण्या च्या वेग वेगळ्या लकबी.मोगऱ्या च्या गजऱ्यातील पाने पाहताना त्याच्या वर जोक बोलायचे कुणी, केसात आजकाल मुलीं रोप, झाड, लावायला लागल्या की काय.एखादी छान बऱ्या पैकी पाना फुलांची च साडी,मैत्रीणी ची किंवा सखे शेजारी असलेली मामी, मावशी कौतुकाने नेसायला द्यायची. माझी मंचर ची सुशीला मावशी सुतारकी च्या बिझनेस मध्ये भरपूर कमाई झाली की तिच्या भारी, भारी साडया, सोनी चांदीचे दागिने ही मला घालायला देऊन, तु कॉलेज ला जाते ना लेकरा, तु उदघाटन कर, अगदी पायल, पैंजण, झुमके, तिचे सर्वं दागिने मी चार दिवस कॉलेज ला घालून जाणार तेव्हा ती घालणार.अजून ही आठवणं आली की मी विचार करते, अजून आहे ती सुशीला अव्वा,८०च्या आसपास असेल तीच वय. कोण होती ती माझी, भाषा, प्रांत सर्वं वेगळे. कुठले ऋणानुबंध ही फुला सारखी प्रेमळ नाजूक हृदया ची ही मावशी मला लाभली 🌹आई सारखं कोडं कौतुक करणारी. हे सुख आमच्या पिढी ने अनुभव ल. अशी माया आताच्या पिढी ला देणार कुणी मिळेल का? नक्कीच नाही. सुशीला अव्वा तुझ्या मायेचा सोनचाफी सुगंध सदैव माझ्या आठवणी त दरवळतोय 🌹मी म्हातारी झाले, पण तो सुगंध ताजा तवाना आहे 🌹 सुप्रभात 🌹मित्र मैत्रिणींनो, स्वामी प्रभात 🌹. ............. सुलभा (काव्या )वाघ १५=३=२०२३