चांगल्या कर्मात देव असतो सत्कर्म करा देव शोधण्याची आवश्यकता भासणार नाही
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
15th Mar, 2023
Share
*चांगल्या कर्मात देव असतो सत्कर्म करा देव शोधण्याची आवश्यकता भासणार नाही*
दैनंदिन जीवनात आपण आपलं प्रत्येक कर्म करताना योग्य काळजी दक्षता घेतली सतर्क असलोत तर आपल्या मुळे इतर कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.आपला कोणालाही त्रास होऊ नये हेच सगळ्यात उत्कृष्ट कर्म आहे. सत्कर्म , सत्यनिष्ठ आचरण, कर्मात देवत्व निर्माण केले तर इतरत्र जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला देव शोधण्याची गरज भासणार नाही. देव शोधण्याची प्रत्येकाची पद्धत हि वेगळी असली तरीही देवाचा शोध नाही असं फार कोणी सापडणार नाही.सृष्टी वर देव आहे नाही हे माहित नाही पण चांगल्या कर्मात देव नक्कीच आहे .म्हणून चांगलं कर्म करा देव शोधण्याची गरज पडणार नाही.देव आहे कि नाही मग आहे तर कुठं आहे नाही तर कसा नाही .असं व्यक्तिपरत्वे अनेक मतमतांतरे आहेत.पण आपण दैनंदिन नित्य जे कर्म करतोय हे कर्म जर सात्विक, सत्यनिष्ठ, आणि इतर कोणत्याही जीवला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं असेल तर त्या कर्मा मध्ये ईशवाराच रूप आहे. आपण आपल्या कर्मा मध्ये ईशवाराच रूप शोधण्याऐवजी इतरत्र ठिकाणी भटकंती करतो .तुज आहे तुज पाशी परी तु जागा चुकलाशी अशीच आपली कहिशी अवस्था होते .देव शोधुन सापडायला तो काही बाजारातील वस्तू नाही.कि आपण बाजारात गेलो पैसे दिले आणि देव खरेदी केला असं कल्पनेत सुद्धा शक्य नाही. मुळात आपण कोणतीही बाब गोष्ट समजून किती व्यवस्थित घेतोय त्यानुसार त्याचा अंतिम अर्थ निष्कर्ष आपल्याला सापडतो . मुळात देवाच्या अस्तित्वाचा प्रश्न सोडवत बसण्या ऐवजी अथवा इतरत्र देवाचा शोध घेत बसण्या ऐवजी आपलं कर्म असं करा कि आपल्याला देव कुठेही शोधण्याची आवश्यकता भासली नाही पाहिजे. धर्म पंथ तत्त्व तत्त्वज्ञान हे कोणतंही असलं तरी ते ईश्वरीय शक्तिच्या परिघातच फिरत .मुळ ज्ञान तत्वज्ञान आपण बगल देऊन आपल्या सोयीनुसार वापरतो . इथंच खरा छेद मिळतो . धर्म संस्कार संस्कृती शास्त्र हे सत्यनिष्ठच असतात.पण आपल्याला त्याचा योग्य अर्थ सापडत नाही.महणुन आपण चुकीचा अर्थ घेऊन योग्य मार्ग शोधतो . म्हणजे आपला शोध आणि बोध किती कल्पनिय आहे. दैनंदिन आपण अनेक कर्म करतो अथवा ती आपल्याला दैनंदिन जीवन व्यथित करण्यासाठी करावीच लागतात कर्म कोणालाही चुकतं नाही मग हेच कर्म करताना आपण जो मार्ग अंवलबतो तो मार्ग महत्वाचा असतो . मुळात हा मार्ग जर योग्य सापडला शोधता आला तर आपल्या सगळ्या अडचणी समस्या संपुष्टात येतात आणि मार्ग चुकला तर दिशा चुकते आणि आपण भटकंती करतो .हिच भटकंती आपल्याला अनेक ठिकाणी घेऊन जाते . मुळात कर्मात देव आहे हे सुरवातीला समजलं तर पुढील भटकंती होणार नाही.आपण सुरवातीला समजुन घेत नाहीत म्हणून शेवटपर्यंत आपल्याला भटकत राहव लागत सुरुवात चुकली तर शेवट बरोबर कसा येईल म्हणून विचार पुर्वक कर्म केले तर आपल्याला काहिच अडचण उद्भवत नाही अथवा इतरत्र कुठेही देव शोधत बसण्याची आवश्यकता नाही. पण अस न करता आपण इतरांच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो इतरांच अनुकरण मग ते कसं आहे कोणत्या मार्गवर आहे ते सत्यनिष्ठ आहे कि असत्य आहे हे तपासण्याची तसदी सुद्धा आपण घेत नाही.मुळात मानव हा अनुकरणीय असल्याने आपण आपल्या स्वतःच्या विश्वासावर ठाम न राहता इतरांच कर्म पाहुण अनुकरण करतो. .आणि तेही जास्तीत जास्त वाईट कर्म तर खुप लवकर अनुकरण करतो .चांगलं कर्म सात्विक कर्म हे थोडस कठिण जात म्हणून आपण त्या कडे जास्ती जास्त दुर्लक्ष करतो आणि वाईट कर्मा कडे आकर्षित होतो . आणि मग क्षमायचना करण्यासाठी पुन्हा मंदिर शोधतो .देवा समोर क्षमायाचना करतो . काही प्रमाणात आपण देवाला सुद्धा प्रलोभन देण्याचा यशस्वी प्रयत्न करतो .आणि खोटं खोटं क्षणिक समाधान शोधतो .या सगळ्या घडामोडी भोवती आपलं सगळं आयुष्य चक्र फिरत राहतं . मुळात कर्म सात्विक सत्यनिष्ठ करा आपल्या कार्यात देवत्व निर्माण होईल.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक