Bluepad | Bluepad
Bluepad
संवत्सर. *
balaji dhage
balaji dhage
15th Mar, 2023

Share

निसर्ग चक्र फिरे. ऊन्हाळा पावसाळा हिवाळा असे पृथ्वी वर चक्र फिरत असते. पाऊस पडला तरच पिके येतील. फारकाय सांगावे ऊन्हानी तप्त धरती तापली तर च जमिनीतून पीक येतील. भरपूर पाऊस पडेल. वर्षाचे तीन भाग कल्पून मराठी त तीन ऋतू मानले जातात आपले सण तिथीवर अवलंबून असतात. शिमगा पाडवा क्रमाणे सण पुढे सरकत असतात. फाल्गून महिण्यात पोर्णिमेला होळी सण साजरा करतो. फाल्गून अमावस्येनंतर मराठी वर्ष समाप्ती होते. सालाचा प्रारंभ प्रतिपदेने होतो.
आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात मराठी वर्षारंभ पाडवा सणानी होतो. सणांचा प्रारंभ म्हणजेच पाडवा. हा चैत्र शुद्दे प्रतिपदेला साजरा करतात. त्या सणाला आपण गुढीपाडवा असेहीम्हणतो. हा गुढीपाडवा का साजरा करतो. त्यामागील एक रहस्य आहे. भारतीय संस्कृती चे यातच गमक दडलेले आहे. प्रभु रामचंद्र अयोध्देला चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्देस परत आहले नगरीतील प्रजा आनंदली. राजा परत येतोय म्हणून अवघी अयोध्दा नगरी नववधूसमान नटली. गुढ्या तोरणे घरोघरी ऊभारल्या. श्रीराम राजा स्वागतासाठी प्रजा अयोध्देबाहेर जमली स्वागता सज्ज झाली. रस्त्यावर गुलाबजल शिंपडण्यात आले. पुष्पवृष्टी करण्यात आली. सियावर रामचंद्र महाराज की जय. या नामघोषानी अवघी नगरी दूमदूमली. धन्य तो नयनरम्य सोहळा अयोध्या नगरीतील प्रजाजनानी पाहिला. ही आठवण म्. णून आपण चैत्र प्रतिपदेदा आपण पाडवा सण दरवर्षी साजरा केला जातो.
संवत्सर. *
धन्य ती प्रजा अन धन्य तो देश.
💐🎁🎉🎁💐
~बालाजी ढगे.
कविवर्य देगलूर.
🎊🎈🎊

0 

Share


balaji dhage
Written by
balaji dhage

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad